पुणे जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेसचे दोन आमदार बिनविरोध तर अजितदादा-भरणेंची प्रतिष्ठा पणाला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुणे जिल्हा बँक निवडणूक : काँग्रेसचे दोन आमदार बिनविरोध तर अजितदादा-भरणेंची प्रतिष्ठा पणाला

पुणे -

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. संचालक पदाच्या 21 जागांसाठी 299 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर 10 उमेदवारांचे अर्ज बाद झाले, तर चौघा जणांचा निकाल राखीव ठेवण्यात आला आहे. प्रतिस्पर्धी उमेदवारांचा अर्ज बाद झाल्याने भोरमधून काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि पुरंदर हवेलीचे काँग्रेस आमदार संजय जगताप बिनविरोध निवडून आले आहेत. तर आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड आधीच निश्चित झाली होती. आज (बुधवारी) पात्र उमेदवारांची यादी निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध केली जाणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांच्यासह अनेक दिग्गज जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात आहेत. अजित पवार यांच्यासह सर्व विद्यमान संचालक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. भाजपच्या वतीने बहुतेक सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस समोर सध्या तरी आव्हान उभे केले आहे. आठ मतदार संघातील तब्बल 5 हजार 166 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत.

० निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे :
– उमेदवारी अर्ज मागे घेणे : 8 डिसेंबर ते 22 डिसेंबर
– जिल्हा बँकेसाठी मतदान : 2 जानेवारी 2022
– मतमोजणी : 4 जानेवारी 2022

बँकेचे संचालक मंडळ : 21
– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13
– ब मतदार संघ : 1
– क मतदार संघ : 1
– ड मतदार संघ : 1
– अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1
– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1
– विभक्त जाती व प्रजाती : 1
– महिला प्रतिनिधी : 2