वाकड ताथवडे पुनावळे प्रभागांतून ५ हजाराचे लीड देणार - तारामन (अण्णा) कलाटे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

वाकड ताथवडे पुनावळे प्रभागांतून ५ हजाराचे लीड देणार - तारामन (अण्णा) कलाटे

नाना काटे यांच्या विजयासाठी ज्येष्ठ शिवसैनिक सरसावले !

पिंपरी, दि. २० – मिंधे गटाला हाताशी धरून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय जनता पक्षाला धडा शिकविण्याची संधी चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे. त्यामुळे भाजपाच्या पराभवासाठी चिंचवड मतदार संघातील ज्येष्ठ शिवसैनिक सरसावले असून वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरातून नाना काटे यांना किमान पाच हजाराचे मताधिक्य देण्याचा निर्धार तारामन (अण्णा) कलाटे यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ शिवसैनिकांनी केला आहे.

या वेळी बोलताना तारामनअण्णा कलाटे म्हणाले, 'भारतीय जनता पक्षाने आमच्या अस्मितेवर हल्ला केला आहे. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने कार्यकारी प्रमुख बनलेल्या उध्दव ठाकरे यांना कटकारस्थान करुन तसेच खोक्यांचा वापर करून मुख्यमंत्री पदावरून उतरवले. त्याचा बदला घेण्यासाठी संपूर्ण शिवसेना मैदानात उतरली आहे. उध्दव टाकरे यांच्याशी केलेली गद्दारी हा महाराष्ट्र विसरणार नाही. भाजप उमेदवाराला पराभूत केल्याशिवाय आमचा एकही शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही', असेही कलाटे म्हणाले.  

भारतीय जनता पक्षाच्या लोकशाही मोडीत काढण्याच्या कुटनीतीमुळे शिवसैनिक प्रचंड दुखावला आहे. खोके सरकारच्या मदतीने शिवसैनिकात फूट पाडणाऱ्या भाजपचा चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वचपा काढण्याची संधी चालून आली आहे. यावेळी आमचा पक्ष हा महाविकास आघाडीचा उमेदवार असणाऱ्या नाना काटे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे तारामन कलाटे यांनी सांगितले.

भाजपच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून भाजपच्या चिंचवड विधानसभेतील तीन विद्यमान आणि एक माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे चिंचवड विधानसभेत खळबळ निर्माण झाली असून भाजप बॅकफूटवर गेला आहे. भाजपला साथ देणाऱ्या लोकप्रतिनिधींना अत्यवस्थ अवस्थेत प्रचाराला आणि मतदानाला बोलावणाऱ्या स्वार्थी आणि भ्रष्ट भाजप नेत्यांनीच भावनेचा बाजार मांडल्याने मत तारामन कलाटे यांनी पुनावळे येथील कोपरा सभेवेळी मांडले.

यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील, माजी नगरसेवक मयूर कलाटे, रेखा दर्शीले, संदीप पवार, सुप्रिया पवार, विजय दर्शिले, माजी सरपंच लक्ष्मण मोहिते, संभाजी शिंदे, सागर ओव्हाळ, राजाराम काटे, प्रकाश काटे, सुरेश रानवडे, किरण बोरगे, सुभाष कोयते, शिवाजी बांदल, अतुल काटे, सचिन झिंजुर्डे, राहुल काटे, ईश्वर ओव्हाळ, राजेंद्र गायकवाड, शांताराम बोडके, बाळासाहेब बोडके, अक्षय भुजबळ, श्रीकांत ढवळे, सुनील ढवळे यांच्यासह पुनावळेतील राष्ट्रवादी काँग्रेस व असंख्य शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

पुनावळे येथील बुद्ध विहार, बोरगेवाडा, भैरवनाथ मंदिर, पुणे शहर सावता माळी मंदिर ते मोहिते कॉम्प्लेक्स पर्यंत पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर कोयतेवस्ती, पांढरे वस्ती, काटे वस्ती, ताजणे वस्ती, विजयनगर, माळवाडी या परिसरात रॅली काढून शिवसेनेच्या नगरसेविका रेखा दर्शीले यांच्या निवासस्थानी जनतेशी संवाद साधला.

आबांची आठवण आणि रोहितचा विश्वास

  • राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्याविषयी नागरिकांमध्ये कमालीचे औत्सुक्य होते. आबांची आठवण करून देणाऱ्या शैलीत त्यांनी ही निवडणूक भावनिकतेच्या जोरावर लढणाऱ्या भाजपावर चांगलेच प्रहार केले. प्रकृती अस्वस्थ असताना रुग्णवाहिकेतून लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांना ऑक्सिजन लावलेल्या अवस्थेत मतदानाला मुंबर्ईला नेले. खासदार गिरीश बापटांना अत्यवस्थ असताना प्रचारात उतरवले. हा सत्तापिपासूपणा कमी झाला की काय म्हणून आता भावनिकतेची साद घालत आहेत, अशी भाजपवर टीका करून विकासकामांच्या जोरावरच राष्ट्रवादी काँग्रेस विजयी होईल. त्या विजयाची हमी आणि त्यासाठी करायच्या कष्टाची तयारी मला कार्यकर्ते आणि नागरिकांच्या कृतीतून जाणवत आहे, असे रोहित पाटील यांनी सांगितले.