तुरुंगवास टाळण्यासाठी एक डिसेंबरपासून सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित 'हा' नवा नियम जाणून घ्या !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तुरुंगवास टाळण्यासाठी एक डिसेंबरपासून सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित 'हा' नवा नियम जाणून घ्या !

नवी दिल्ली -

गेल्या काही वर्षांत दागिन्यांच्या शुद्धतेसाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा शब्द म्हणजे 'हॉलमार्क' आहे. सरकारने आता हॉलमार्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना त्याचा लाभ मिळून गैर प्रकारांना आळा बसू शकतो. एक डिसेंबरपासून म्हणजे उद्यापासून तुमच्या सोन्याच्या दागिन्यांशी संबंधित असा नियम लागू होणार आहे, ज्याचे पालन न केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.

ज्वेलर्सना 30 नोव्हेंबरपर्यंत दिलेली सवलत देण्याची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपणार आहे, म्हणजेच आता हॉलमार्किंगचे नियम काटेकोरपणे पाळणे बंधनकारक आहे.  असे न केल्यास ज्वेलर्सवर कडक कारवाई केली जाऊ शकते. देशभरातील 256 जिल्ह्यांमध्ये हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. या अंतर्गत ज्या ज्वेलर्सची उलाढाल 40 लाखांपेक्षा जास्त आहे किंवा ज्यांनी नोंदणी केली, त्यांच्या दुकानातील प्रत्येक दागिन्यावर हॉलमार्क असणे आवश्यक आहे. याशिवाय विकल्या जाणाऱ्या सर्व दागिन्यांवर हॉलमार्किंग बंधनकारक आहे.

त्याचबरोबर ज्वेलर्ससाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही तयार करण्यात आलीत, ज्यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या दुकानाबाहेर एक डिस्प्ले बोर्डही लावला जावा, ज्यामध्ये या दुकानात हॉलमार्क केलेले दागिने उपलब्ध आहेत, असे लिहावे. ग्राहकांना हॉलमार्क दाखवण्यासाठी दुकानातच ग्लास आणि हॉलमार्किंग शुल्क लिखित स्वरुपात असलेला चार्ट तयार करणे बंधनकारक आहे. तसेच प्रत्येक दुकानात बीआयएस क्रमांक आणि पत्ता देणे आवश्यक आहे.

यासोबतच बीआयएसने नियुक्त केलेले काही एजंटही दुकानात जाऊन हॉलमार्किंग, दागिन्यांमध्ये हॉलमार्किंग योग्य प्रकारे झाले आहे की नाही, याची तपासणी करणार आहेत, त्यासाठी दुकानांमधून नमुने घेतले जातात. उद्यापासून हॉलमार्किंगची अंमलबजावणी न केल्यास कारवाईही केली जाणार आहे. याआधीही याबाबत सातत्याने चौकशी केली जात होती, मात्र आता ती अनिवार्य करण्यात आलीय.

अहवालानुसार, जेव्हा हॉलमार्किंग अनिवार्य करण्यास सांगितले होते, तेव्हा त्या काळात 780 केंद्रे होती, परंतु आतापर्यंत केवळ साडेआठशे केंद्रांवरच काम झाले. अशा परिस्थितीत प्रत्येक जिल्ह्यात किमान एक केंद्र असेल, तर ते तेथे बंधनकारक करावे, असे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र व्यवसाय कमी असल्याने अनेक केंद्रे बंद पडली आहेत.

हॉलमार्क हे सोन्याच्या शुद्धतेचे मोजमाप आहे. या अंतर्गत भारतीय मानक ब्युरो प्रत्येक सोन्याच्या दागिन्यांवर त्याच्या चिन्हासह शुद्धतेची हमी देते. हॉलमार्क अनिवार्य केल्यानंतर देशात केवळ 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचे दागिने विकले जातील, असेही केंद्रानं स्पष्ट केले.