मुंब्रा परिसरातील दोन कारवायांमधून तब्बल 16 लाखांचे अंमली पदार्थ जप्त; चार आरोपी जेरबंद
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
19 नोव्हेंबर रोजी मुंब्रा बायपास रोडवर वाय जंक्शनजवळ पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उप निरीक्षक हर्षद काळे व एन.डी.पी.एस. पथकातील पोलीस स्टाफने सापळा रचून आरोपी गोडविन इमानियल इफेनजी याला बेड्या ठोकल्या. तो नवी मुंबईतील रहिवासी असून आरोपीची झडती घेतली असता 100 ग्रॅम एमडी पावडर सापडली. तिची किंमत बाजारात प्रति ग्राम 5 हजार 60 रुपये आहे. तर सापडलेला साठा हा 5 लाख 6 हजाराचा होता. त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपीला न्यायालयात नेले असता त्याला 22 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
अंमली पदार्थ विरोधातील दुसरी कारवाई 20 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापाला रचून आरोपी नदीम मेहबुब खानला अटक केली. तो अमृतनगर, मुंब्रा इथला रहिवासी आहे. त्याच्याकडून 10 लाख रुपयांची 110 ग्रॅम मोफेडीन एमडी पावडर हस्तगत केली. त्याच्या विरोधातही मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात नेले असता 27 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे अधिक तपास करत आहेत.