एलियन्स माणसांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत? अवकाशातून मिळालेल्या सिग्नलने शास्त्रज्ञ थक्क !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

एलियन्स माणसांशी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत? अवकाशातून मिळालेल्या सिग्नलने शास्त्रज्ञ थक्क !

नवी दिल्ली - 

अवकाशातील रहस्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शास्त्रज्ञांना नुकतीच एक अशी गोष्ट आढळली आहे, ज्यामुळे अवघ्या जगाला धक्का बसेल. शास्त्रज्ञांनी अंतराळातून येणारा एक रहस्यमय सिग्नल पकडला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, अंतराळातून येणारे रहस्यमय सिग्नल एलियन्सच्या अस्तित्वाचे संकेत देत आहेत, परंतु अद्याप याची पुष्टी झालेली नाही. याचा शोध घेण्यात शास्त्रज्ञ व्यस्त आहेत. एलियन्सबद्दल अनेकदा दावे केले जातात. आता प्रश्न असा आहे की, या विश्वात मानवाशिवाय इतर प्राणी आहेत का?

संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की रेडिओ सिग्नल रेडिओ स्त्रोताच्या पॅटर्नमध्ये कधीही बसत नाहीत. अंतराळातून येणारे सिग्नल कोणत्यातरी अज्ञात खगोलीय वस्तूकडे निर्देश करतात. द ऍस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित झाले आहे, ज्यामध्ये खगोलशास्त्रज्ञांनी त्यांच्या तपासणीचे परिणाम शेअर केले आहेत. मुख्य लेखक जितेंग वांग म्हणतात की नवीन सिग्नलची खास गोष्ट म्हणजे त्यात अधिक ध्रुवीकरण आहे. सिडनी विद्यापीठाच्या प्रसिद्धीपत्रकात त्यांनी ही माहिती दिली आहे.

जितेंग वांग म्हणाले की, याआधी असे काहीही पाहिले नव्हते. त्यांनी सांगितले की, याआधी असे वाटले होते की हे सिग्नल ताऱ्यातून येत आहेत, परंतु या लहरींचा पॅटर्न त्या पॅटर्नच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. वांग आणि तज्ञांच्या आंतरराष्ट्रीय संघाने स्त्रोत शोधण्यासाठी ऑस्ट्रेलियातील CSIRO च्या ASKAP रेडिओ दुर्बिणीचा वापर केला. संशोधकांनी या वस्तूला ASKAP J173608.2-321635 असे नाव दिले आहे. स्कूल ऑफ फिजिक्स आणि सिडनी इन्स्टिट्यूट फॉर ऍस्ट्रॉनॉमीमधील प्राध्यापक तारा मर्फी म्हणतात की अंतराळातून सिग्नलचा स्त्रोत आश्चर्यकारक होता आणि यापूर्वी कधीही पाहिलेला नव्हता. त्याची वागण्याची पद्धत कमालीची होती. 2020 मध्ये, नऊ महिन्यांत स्त्रोतावरून सहा रेडिओ सिग्नल सापडले, त्यानंतर खगोलशास्त्रज्ञांनी ऑब्जेक्टबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शोधानंतर, त्याच्या उत्पत्तीबद्दल अद्याप बरेच प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे सापडलेली नाहीत.