औरंगाबादेत स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
वैभव विष्णू विरकल (वय 22 वर्ष, रा.आडगाव बुद्रुक) असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. वैभवने बीएससी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं होतं. तो आता स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. त्याचे वडील एका कंपनीत नोकरी करतात, तर त्याची आई गृहिणी आहे.
गुरुवार 15 डिसेंबर रोजी वैभवचे वडील कंपनीमध्ये गेले होते, तर भाऊ कॉलेजमध्ये होता. आई आणि तो दोघेच घरी होते. दुपारच्या सुमारास अभ्यास करण्यासाठी तो त्याच्या खोलीत गेला. यावेळी आई घरातील कामं करत होती. बराच वेळ होऊनही वैभव बाहेर आला नाही. त्याला आवाज दिला असता प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून दरवाजा तोडून बघितला असता वैभवने गळफास घेतल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान घरच्यांच्या मदतीने त्याला तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस अंमलदार एस. बी. घुगे करत आहेत.