भंगार व्यावसायिकाचे अपहरण करून उकळली खंडणी 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भंगार व्यावसायिकाचे अपहरण करून उकळली खंडणी 

पिंपरी - कंपनीत भंगार आहे, त्यासाठी चल असे म्हणून भंगार व्यावसायिकाचे अपहरण केले. त्यानंतर व्यावसायिकाला निर्जन ठिकाणी नेऊन मारहाण करून 40 हजारांची खंडणी वसूल केली. हा प्रकार 15 ऑक्‍टोबर रोजी दुपारी तीन ते पाच या कालावधीत भांबोली गाव परिसरात घडला. 

याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने गुरुवारी (दि. 21) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादी यांचे भंगारचे दुकान आहे. आरोपी 15 ऑक्‍टोबर रोजी दुपारी तीन वाजता फिर्यादी यांच्या भंगारच्या दुकानावर आले. "कंपनीमध्ये भंगार आहे. तू आमच्या बरोबर चल' असे म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना दुकानापासून काही अंतरावरील डोंगरावर निर्जन ठिकाणी नेले. तिथे आरोपींचे काही साथीदार थांबले होते. 
एकाने फिर्यादी यांच्या पोटावर चाकू लावून धमकावले. तसेच आरोपींनी झाडाच्या फांदीने फिर्यादी यांना मारहाण करत दोन लाखांची खंडणी मागितली. फिर्यादी यांनी त्यांच्या मित्राकडून 23 हजार रुपये आणि पत्नीकडून 17 हजार रुपये मागवले. एकूण 40 हजार रुपये आरोपींनी घेतले आणि आणखी 60 हजारांची मागणी केली. तसेच धमकी देत फिर्यादीला सोडून देऊन आरोपी निघून गेले.