'सीए'च्या विविध परीक्षांचे आयसीएआयकडून प्रवेशपत्र जाहीर;  'या' सोप्या पद्धतीने करा डाउनलोड 

'सीए'च्या विविध परीक्षांचे आयसीएआयकडून प्रवेशपत्र जाहीर;  'या' सोप्या पद्धतीने करा डाउनलोड 
नवी दिल्ली -
इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंट ऑफ इंडियानं (ICAI) डिसेंबर महिन्यात होणाऱ्या सीएच्या विविध परीक्षांसाठी प्रवेशपत्र जारी केले आहे. आयसीएआयच्या परीक्षांसाठी अर्ज केलेले विद्यार्थी icaiexam.icai.org वेबसाईटवर भेट देऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. परीक्षा 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर दरम्यान ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. 
आयसीएआयकडून डिसेंबर महिन्यात घेण्यात येणाऱ्या “फाऊंडेशन, इंटरमीडिएट (IPC), इंटरमीडिएट, फायनल परीक्षेसाठी अर्ज केलेले उमेदवार प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. प्रवेशपत्र उमेदवारांची छायाचित्र आणि स्वाक्षरीसह जारी करण्यात आली आहेत. आयसीएआयकडून कोणत्याही उमेदवाराला प्रवेशपत्र पाठवले जाणार नाही. उमेदवारांना वेबसाईटवरुन त्यांचे प्रवेशपत्र डाऊनलोड प्रिंट करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.  
हे प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी पुढील सोप्या स्टेप्स वापरा. 
1. प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी अधिकृत वेबसाईट icaiexam.icai.org ला भेट द्या.
2. वेबसाईटवर दिलेल्या अ‍ॅडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
3. आता आपला नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर आणि जन्मतारीखच्या सहाय्याने लॉगिन करा.
4. आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसून येईल.
5. आता ते डाऊनलोड करा.
6. भविष्यातील संदर्भासाठी त्याची एक प्रिंट आऊट घेऊन ठेवा.