पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या पत्नींना पोलिसांकडून मारहाण

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना पोलिसांनी मारहाण केल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या पत्नींना पोलिसांकडून मारहाण

जयपूर (राजस्थान) - पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पत्नींना मदत देण्याचे राजस्थान सरकारने आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने अद्यापही आश्वासनांची पूर्तता केली नसल्याने शहीद जवानांच्या पत्नी गेल्या दोन दिवसांपासून आंदोलन जयपूरमध्ये आंदोलन करीत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आंदोलनकर्त्यां जवानांच्या पत्नी मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांना भेटण्यासाठी जात होत्या. तेव्हा पोलिसांनी त्यांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून देशात संतापाची लाट उसळली आहे.

पुलवामामध्ये १४ फेब्रुवारी २०१९ मध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर आत्मघातकी हल्ला केला. या हल्ल्यात ४० भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर राजस्थान सरकारने शहीदांच्या पत्नींना मदत देण्याचे आश्वासन दिले. मात्र, सरकारने अद्यापही आश्वासनांची पूर्तता न केल्याने जवानांच्या पत्नींनी राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली. तसेच जयपूरमध्ये आंदोलन सुरू केले.

दरम्यान, आंदोलनकर्त्यां जवानांच्या पत्नी मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांना भेटण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत एक महिला जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

शहीद जवानांच्या पत्नींना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. देशभरातून सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. तसेच भाजपचे राज्यसभा खासदार किरोडी लाल मीणा यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत सरकारने शहीद जवानांच्या पत्नींचा अपमान केला आहे, असा आरोप केला आहे.

https://twitter.com/i/status/1632414938949111808