मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अटक वॉरंट जारी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबई -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात परळीमधील न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले आहे. येथील प्रथम वर्ग परळी वैजनाथ दिवाणी न्यायालयाने (क स्तर) हे वॉरंट जारी केले आहे. जामीन करून देखील सतत तारखेला गैरहजर राहिल्याने राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात येत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
केस क्रमांक आर. सी. सी. १४०००३८/२००९ प्रकरणी परळी वैजनाथ न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीमध्ये वारंवार जामीन दिल्यानंतरही राज ठाकरे न्यायलयासमोर हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. न्यायालयामध्ये या प्रकरणी महाराष्ट्र सरकार विरुद्ध राज ठाकरे असा युक्तीवाद सुरु आहे. आरोपी हा सतत गैरहजर असल्याने आरोपीविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात येत आहे. पुढील सुनावणीला त्यांना न्यायालयासमोर हजर करावे असं न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी असल्याचंही न्यायालयाने स्पष्ट केलं.