दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रालाही स्वातंत्र्य मिळालं ! खासदार संजय राऊतांचा टोला 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रालाही स्वातंत्र्य मिळालं ! खासदार संजय राऊतांचा टोला 
नाशिक -
दोन वर्षापूर्वी महाराष्ट्रालाही स्वातंत्र्य मिळालं. आपला मुख्यमंत्री झाला. आपण त्यांना करेक्ट कार्यक्रम करून दाखवला, अशा शेलक्या शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी नाशकात जोरदार टोलेबाजी केली.नगरसेवक डि. जी. सूर्यवंशी यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यावेळी पार पडलेल्या छोटेखानी कार्यक्रमात राऊतांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 
महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं. ते काय कमी आहे का? आम्ही महाराष्ट्रावर भगवा फडकला. आमचा मुख्यमंत्री झाला. यांना काय जमतं? असं काही लोक म्हणत होतं. पण आम्ही करून दाखवलं. आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला ना, असं सांगतानाच हे सगळं राजकारणात होत असतं. राजकारण हे काही साधुसंतांचं नाही. राजकारण हे चांगल्या कामाचं आहे. चांगल्या कार्यकर्त्यांचं आहे, असेही राऊत म्हणाले. 

नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे मागे घेतले आहेत. त्यावर राऊत म्हणाले की, 700 शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यावर मोदींना वाटलं माघार घेतली पाहिजे. 1947ला स्वातंत्र्यासाठी मोठं आंदोलन झालं. चले जावचा नारा घुमला. अख्खा देश रस्त्यावर उतरला. तेव्हा ब्रिटिशांना वाटलं आपण पळून गेलं पाहिजे. तसंच काल झालं. त्यांना वाटलं आता आपण पळून गेलं पाहिजे. नाही तर जनता रस्त्यावर उतरेल आणि बघणार नाही कोण पंतप्रधान आहे आणि कोण गृहमंत्री आहे. हा शेतकऱ्यांचा विजय झाला. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं, असं ते म्हणाले.

नाशिकमध्ये मनपा निवडणूक आहे. नाशिक हा आपला बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात तर तुम्ही लोकप्रिय आहात. तुम्ही प्रचंड कामे केली आहेत. त्यामुळे उद्या या वॉर्डात पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी डीजी सूर्यवंशी तुम्हीच निवडून याल, असं राऊत म्हणाले.