भगवंताशी समर्पित जीवन जगा! - शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचा संदेश

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भगवंताशी समर्पित जीवन जगा!  - शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांचा संदेश

- भर पावसात भाविक, साधकांचा लाखोंच्या संख्येने सहभाग



  पिंपरी ,  (प्रबोधन न्यूज ) - ‘‘जीवनात सुख-दु:ख हा खेळ सुरूच राहणार आहे. व्यापारात कधी नुकसान, तर कधी फायदा हे ठरलेले आहे. पण, ‘‘तेरी मंदिर मे आना मेरा काम है…और मेरी बिघडी बनाना तेरा काम है… ’’ या भावनेतून भगवंतावर विश्वास ठेवून जीवन कार्य केले पाहिजे. आपण दुसऱ्यांसोबत ज्या प्रसन्नतेने वागतो. तसेच, आपल्या कुटुंबियांशीसुद्धा वागावे. आपल्या घरात प्रसन्नता असावी. आपले जीवन भगवंताच्या विचारांशी समर्पित ठेवा, असा संदेश आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिव महापुराण कथावाचक पंडित प्रदीपजी मिश्रा यांनी दिला.

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवाराच्या वतीने सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर ‘श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथे’चे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक आहेत.  

या सोहळ्यात आजच्या सहाव्या दिवशी मावळ भाजपा प्रभारी, आमदार प्रशांत ठाकूर, लोकसभा महाराष्ट्र प्रभारी माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह,  हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, हभप शंकर महाराज शेवाळे चैतन्य महाराज वाडेकर, ज्येष्ठ गायक राजेश सरकटे, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विनोद बन्सल, माहेश्वर मराठे, दादा विधाते, विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक, राष्ट्रवादीचे पुणे अध्यक्ष दीपक मानकर, ज्येष्ठ नेते हनुमंतराव गावडे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, शरद बुट्टे पाटील, अविनाश कोळी, बँक संघटनेचे अध्यक्ष सुभाष मोहिते, भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्षा सुजाता पालांडे, स्थायी समिती माजी अध्यक्ष नितीन लांडगे,अमित गोरखे,, संतोष लांडगे, सागर भोसले,  सूर्यकांत गोफणे,अमित गावडे, विश्व हिंदू परिषदेचे नितीन वाडकर, दत्तोबा लांडगे, राजाभाऊ गोलांडे,  कैलास जगताप, भरतशेठ लांडगे, राजेश लांडगे, श्रीकृष्ण वर्मा, अरुण देशमुख,आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कथा श्रवणाचा आनंद घेतला.

यावेळी पिंपरी-चिंचवड कुस्तीगीर संघाच्या वतीने हनुमंत गावडे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे यांच्यावतीने शाल व गदा देवून कथा सोहळ्याचे मुख्य निमंत्रक शंकर जगताप यांना सन्मानित करण्यात आले.



पंडित प्रदीप मिश्रा यांनी सांगितले रुद्राक्षाचे महत्व...  
कथेमध्ये बोलताना पं. प्रदीप मिश्रा यांनी आज रुद्राक्षाचे महत्व विषद केले. रुदाक्ष हे फळ असले तरी अनेक गुणकारी आहे. रुद्राक्ष जर तुमच्या शरीराला सातत्याने स्पर्श करत असेल तर यकृत, किडनी, थायरॉईड, कर्करोगासारख्या आजारापासून तुम्हाला संरक्षण मिळेल. अनेकदा रुद्राक्ष संबंधी अनेक गैरसमज पसरविण्यात आले आहेत. तुम्ही कोणत्याही आभूषणाच्या बरोबरीने रुद्राक्ष घातला तरी चालू शकेल, असे मिश्रा यांनी बोलताना सांगितले.      


अयोध्या ही आपली सांस्कृतिक राजधानी…
अयोध्येत राम मंदिराची स्थापना व्हावी, ही आपल्या सगळ्यांचीच इच्छा होती. अनेक वर्षांपासून यासाठी लढा सुरु होता. अनेक कारसेवकांनी यासाठी बलिदानदेखील दिले. त्यानंतर आपले  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रभू श्रीराम मंदिराचे सर्व अडथळे दूर केले आणि भव्य श्रीराम मंदिराच्या निर्माणाला सुरुवात झाली आहे. आगामी काळात आयोध्या ही आपली सांस्कृतिक राजधानी होणार आहे. यासाठी मकर संक्रांतीनंतर आपण सर्वजण रामाच्या दर्शनासाठी जाणार आहोत. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेला ६० वर्ष पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने राममंदिर दर्शनाला येण्याचे निमंत्रण देण्यासाठी आलो असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय सत्संग प्रमुख दादा वेदक यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भर पावसात भाविक सभामंडपाच्या बाहेर बसून…
गेल्या सहा दिवसापासून पं. प्रदीप मिश्रा यांच्या श्री अष्टविनायक शिव महापुराण कथेचे आयोजन सांगवी येथे केले आहे. लाखोच्या संख्येने भाविक ही कथा ऐकण्यासाठी सभामंडपात येत आहे. भाविकांच्या ओघामुळे तीनही सभामंडप भाविकांच्या गर्दीने भरून जात आहेत. आज सहाव्या देखील अशीच स्थिती होती. यावेळी पावसाचे आगमन झाले. मात्र, भर पावसातही भाविक आपल्या जागेवर ठिय्या मांडून बसले होते. गणेशोत्सव आणि भर पावसात भाविकांचा उत्साह आणि उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल निमंत्रक शंकर जगताप यांनी जाहीरपणे आभार मानले.

उद्या शिव महापुराण कथेचा समारोप
गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेल्या श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचा उद्या (दि. २१ सप्टेंबर) समारोप होणार आहे. गेल्या सहा दिवसांपासून पीडब्ल्यूडी मैदानावर या कथेचे आयोजन करण्यात आले होते. उद्या या कथा सोहळ्याचा समारोप होणार आहे. समारोपाची कथा सकाळी ८ ते ११ या वेळेत होणार आहे. सर्व भाविकांनी वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपा शहराध्यक्ष व कथा सोहळ्याचे मुख्य निमंत्रक शंकर जगताप यांनी केले आहे.