खोपोलीजवळ घाटात गॅस टँकर उलटला; तीन ठार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
लोणावळा, दि. 9 मे - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर उलटल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली आहे. आज (सोमवार) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात होता. खोपोली एक्झिट जवळ उतारावर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने टँकर पुणे लेनवर येऊन उलटला. यावेळी टँकरला गाड्या धडकल्याने भीषण अपघात घडला आहे. या अपघातात गॅस टँकरचा चालक देखील गंभीर जखमी झाला आहे. त्याला पुणे येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महामार्गावरील दोन कार या क्रेनच्या मदतीने बाजूला करण्यात आल्या आहेत. खोपोली अग्निशमन विभागाच्या मदतीने टँकर महामार्गावरून हटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, सुदैवाने टँकरमधील गॅसची गळती झाली नाही. सध्या टँकर उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खबरदारी म्हणून खोपोली अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज असून खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.
बोरघाट पोलीस यंत्रणा, आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.