चला एक तास स्वच्छता श्रमदानात लघुउद्योजकांचा सहभाग
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या “ चला एक तास स्वच्छता श्रमदानात सहभागी होऊया “ या मोहिमेत लघुउद्योजकांचा मोठ्याप्रमाणात सहभाग नोंदविला .
रविवार दि.०१ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड लघूउद्योग संघटना व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या “स्वच्छतेसाठी १ तास श्रमदानात सहभागी होऊया” या मोहिमेअंतर्गत राबविण्यात आलेल्या श्रमदानात सेक्टर नं.७ PCNTDA भोसरी या औद्योगिक परिसरातील गोल्ड स्टार वजन काटा व हॉलीबॉल ग्राउंड या ठिकाणी रस्ता व ग्राउंड स्वच्छ करण्यात आले. या प्रसंगी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष-संदीप बेलसरे, खजिनदार-संजय ववले, संचालक-संजय सातव, प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, सचिन आदक स्विकृत संचालक - माणिक पडवळ, संजय भोसले, बशिरभाई तरसगार, चांगदेव कोलते, राजू देशपांडे तसेच सेक्टर ७ व १०, तळवडे, चिखली, कुदळवाडी या परीसरातील लघुउद्योजक तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क प्रभाग सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे व अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली स्वच्छतेची शपथ सर्व लघुउद्योजक व पालिका कर्मचारी यांनी घेतली. या करिता प्रत्येकाने स्वईच्छेने एका वर्षात १०० तास, दर आठवड्यात दोन तास आपापल्यापरीने आपल्या परिसराची स्वच्छता करण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे आपल्या परिसरातील रस्ते, गल्ली, वार्ड, गाव, तालुका, जिल्हा, राज्य पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत होईल. आपल्याला रोगराईवर विजय मिळविण्यास मदत होईल. आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपले आरोग्य सुधारण्यास मदतच होईल.