पिंपरी-चिंचवडमध्ये शिव महापुराण विचारांचा ‘जागर’ - भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा पुढाकार

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once


- लोकनेते लक्ष्मण जगताप मित्र परिवाराकडून आयोजन


 पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) -    ‘उद्योगनगरी’ पिंपरी-चिंचवडमध्ये शिव महापुराण विचारांचा जागर व्हावा. त्यानिमित्ताने तब्बल सात दिवस कथा श्रवण करता यावी याकरिता श्री अष्टविनायक शिव महापुराण कथा वाचनाचे आयोजन केले आहे. परमपूज्य पंडित प्रदीप शर्मा यांच्या सुश्राव्य वाणीतून हा अभूतपूर्व अध्यात्मिक सोहळा रंगणार आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप मित्र परिवार, निर्माल्य फाउंडेशन यांच्या वतीने श्री अष्टविनायक शिवमहापुराण कथेचे आयोजन दि. १५ ते २१ सप्टेंबर २०२३ दरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत पीडब्ल्यूडी मैदान, नवी सांगवी येथे केले आहे.

मध्यप्रदेश येथील प. पु. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या अमोघ वाणीतून ही कथा ऐकण्याची संधी पिंपरी-चिंचवडवासीयांना मिळणार आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांचे हजारो अनुयायी कथेचे श्रवण करण्यासाठी येणार आहेत. या दिवसांमध्ये सुमारे आठ ते नऊ लाख श्रोते या कथेचे श्रवण करतील. त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

वेगाने विकसित होणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भक्ती आणि शक्ती अशा दोन्ही गुणांचा संगम झाला आहे. याची अनेक प्रतीके शहरात उपलब्ध आहे. हाच भक्ती आणि शक्तीचा वसा लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांनी घेताना शहरात विकासाची दमदार वाटचाल केली होती. या कथेच्या माध्यमातून हीच परंपरा पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, अशा भावना शंकर जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत.


     "लोकनेते लक्ष्मण जगताप यांनी दाखविलेल्या अध्यात्मिक आणि सामाजिक कार्याच्या मार्गावर आम्ही कार्यरत आहोत. श्रावण महिन्यामध्ये श्री अष्टविनायक शिव महापुराण कथेचे आयोजन करताना नागरिकांना अध्यात्मिक दिव्यतेची प्रचिती यावी, असा हेतू आहे. याकथा वाचनाच्या कार्यक्रमाला शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करतो."
        - शंकर जगताप, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड.