तेलंगणातल्या पोचमपल्ली गावाला संयुक्त राष्ट्राकडून पर्यटनाभिमुख गावाचा दर्जा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

तेलंगणातल्या पोचमपल्ली गावाला संयुक्त राष्ट्राकडून पर्यटनाभिमुख गावाचा दर्जा
हैदराबाद -
इकत शैलीतील साड्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या तेलंगणातील पोचमपल्ली या गावाला संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक पर्यटन संघटनेकडून (UNWTO) सर्वोत्तम पर्यटनाभिमुख गावांपैकी एक गाव म्हणून निवडण्यात आलं आहे. हे गाव तेलंगणाची राजधानी हैदराबादपासून 50 किलोमीटरवर आहे. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्या कार्यालयाने मंगळवारी जारी केलेल्या अधिकृत पत्रकात ही माहिती देण्यात आली.

गावातील लोकांचे अभिनंदन करताना, केंद्रीय सांस्कृतिक, पर्यटन आणि पूर्वोत्तर क्षेत्राचे विकास मंत्री, रेड्डी म्हणाले की, स्पेनमधील माद्रिद येथे 2 डिसेंबर 2021 रोजी UNWTO आमसभेच्या 24 व्या सत्रात हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला जाईल. मंत्री पुढं म्हणाले, “पोचमपल्ली आणि विशेष करुन तेलंगणातील लोकांतर्फे, पोचमपल्ली गावाला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. पोचमपल्ली यांचे प्रभावीपणे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांचेही मी आभार मानतो.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘वोकल फॉर लोकल’ या मंत्रातून पोचमपल्लीचा विकास झाला. इथल्या विणकाम कलेला आत्मनिर्भर भारत अंतर्गत विशेष महत्त्व मिळालं आहे. नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली गावात, विशिष्ट ‘इकत’ शैलीत साड्या बनवल्या जातात, म्हणून त्याला भारताचे ‘सिल्क सिटी’ म्हटले जातं.

पोचमपल्ली इकत शैलीला 2004 मध्ये GI मानांकन मिळालं होतं. पर्यटन मंत्रालयाने UNWTO सर्वोत्कृष्ट पर्यटन गावासाठी भारतातील 3 गावांची नावे सुचवली होती. यामध्ये मेघालयातील कोंगथांग, मध्य प्रदेशातील लाडपुरा खास आणि पोचमपल्ली ही नावं होती. UNWTO ने सर्वोत्तम पर्यटन खेड्यांपैकी एक म्हणून पुरस्कार देण्यासाठी पोचमपल्लीची निवड केली आहे.