केन विल्यमसननंतर काईल जेमिसनची टी-20 मालिकेतून माघार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “केन विल्यमसन आणि काइल जेमिसन यांच्याशी बोलल्यानंतर आम्ही निर्णय घेतला आहे की, हे दोन्ही खेळाडू टी-20 मालिकेत खेळणार नाहीत. कसोटी मालिकेसाठी ते दोघे संघात सामील होणार आहेत.” न्यूझीलंड हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा पहिला विजेता आहे. या संघाने यावर्षी जूनमध्ये भारताचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली होती.
न्यूझीलंड संघाला भारत दौऱ्यावर 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिला कसोटी सामना 25 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 3 डिसेंबर ते 7 डिसेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल.
० भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा 15 सदस्यीय कसोटी संघ
केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), डेव्हॉन कॉनवे, काइल जेमिसन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, विल सोमरविले, टिम साउथी, रॉस टेलर, विल यंग, नील वॅगनर
० भारत दौऱ्यासाठी किवी संघात 5 फिरकीपटू
भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडने आपल्या कसोटी संघात 5 फिरकी गोलंदाज ठेवले आहेत. किवी संघाचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, भारताविरुद्धच्या सामन्यासाठी मी खूप उत्सुक आहे. भारतीय खेळपट्ट्यांवर फिरकीचा खेळ पाहणे रंजक ठरेल. तो म्हणाला की बोल्ट आणि ग्रँडहोमला विश्रांती देण्यामागे संघाचे रोटेशन धोरण आणि बायोबबल हे कारण आहे.
० टी-20 मालिकेचं वेळापत्रक
- पहिला सामना- बुधवारी 17 नोव्हेंबर, सवाई मानसिंग स्टेडियम, जयपुर, सायंकाळी सातपासून
- दुसरा सामना- शुक्रवार, 19 नोव्हेंबर, जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम रांची, सायंकाळी सातपासून
- तिसरा सामना- रविवार-21 नोव्हेंबर, ईडन गार्डन्स स्टेडियम कोलकाता, सायंकाळी सातपासून