कर संकलन विभागाचा उद्या कर संवाद; युपिक आयडी, सर्वेक्षणाची मालमत्ता धारकांना मिळणार सविस्तर माहिती

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कर संकलन विभागाचा उद्या कर संवाद; युपिक आयडी, सर्वेक्षणाची मालमत्ता धारकांना मिळणार सविस्तर माहिती

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -    शहरातील मालमत्ता धारकांसाठी सातत्याने नव-नवीन उपक्रम राबवणाऱ्या कर संकलन व कर आकारणी विभागाचा कर संवाद दिवसेंदिवस यशस्वी होत आहे. या कर संवादमध्ये मालमत्ता धारकांचे प्रश्न 'ऑन दी स्पाॅट' सोडविण्यात येत आहेत. उद्या शनिवारी (दि. 23) सकाळी साडे अकरा वाजता कर संवादचे आयोजन करण्यात आले आहे. या संवादमध्ये प्रामुख्याने युपिक आयडी, मालमत्ता सर्वेक्षण, करामधील सवलत याबद्दल माहिती देण्यात येणार आहे, असे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले आहे.

करदात्यांचे विविध प्रश्न, त्यांना करासंदर्भात येणाऱ्या अडचणी, मनातील शंकांची सोडवणूक करण्यासाठी जन संवाद सभेच्या धर्तीवर ऑनलाइन पध्दतीने 'कर संवाद'चे आयोजन करण्यात येते. हा संवाद फेसबुक, युट्यूबच्या माध्यमातून होणार आहे. तसेच ज्यांना ऑनलाईन उपस्थित राहता येणार नाही, अशा नागरिकांनी महापालिकेमधील कर संकलन विभागाच्या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित रहावे.

या कर संवादमध्ये पालिकेच्या वतीने सुरू असलेल्या मालमत्ता सर्वेक्षणाची आणि मालमत्तांना युपिक आयडी (युनिक प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन कोड म्हणजेच विशिष्ट मालमत्ता क्रमांक)

इत्यंभूत माहिती देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सर्व सेवा तसेच शासनाचे इतर विभाग यांच्यात समन्वय राहण्यासाठी या युपिक आयडीचा वापर केला जाणार आहे. सध्या देशात व्यक्तीचा जसा आधार क्रमांक हा युपिक आयडी म्हणून वापरला जातो, तसाच आता मालमत्तांसाठी युपिक आयडी वापरला जाणार आहे. त्यामुळे मालमत्तेची सर्व माहिती व मालमत्तेशी निगडित सर्व सेवा एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. याचा नागरिकांना कसा फायदा होणार आहे, याबाबत सर्व माहिती देण्यात येणार आहे.