नाराज आमदारांची नाराजी, गैरसमज दूर करू – संजय राऊत
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मध्य प्रदेश पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही
सरकारला धोका नाही, महा विकास आघाडी एकसंघ आहे
मुंबई, (प्रबोधन न्यूज) - शिवसेनेचे काही आमदार मुंबईत नाही. विधान परिषद निवडणुकीनंतर काल रात्री काही आमदारांशी संपर्क होत नाही हे सत्य आहे. पण आता त्या आमदारांशी संपर्क झालेला आहे. काही आमदारांना गैरसमज असल्याने त्यांना नेण्यात आलेले आहे. एकनाथ शिंदे देखील मुंबईच्या बाहेर असून, त्यांच्याशी देखील संपर्क झालेला आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, ज्या प्रकारचे राजकीय चित्र राज्यात निर्माण करण्यात येत आहे. त्यामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचे तथ्य वाटत नाही. काही ठिकाणी संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. ते आम्ही नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करू, आम्ही सर्व आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला जात आहोत.
"आज सकाळपासून काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. महाराष्ट्रात राजस्थान आणि मध्य प्रदेश पॅटर्नप्रमाणे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडावं, अशी हालचाल गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. पण मध्य प्रदेश पॅटर्न, राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही. त्यांचे प्रयत्न नक्कीच सुरू आहेत. या पद्धतीने तुम्हाला किंगमेकर होता येणार नाही. या पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्र अस्थिर करता येणार नाही. या पद्धतीने महाराष्ट्रावर घाव घालता येणार नाही."
"शिवसेनेवर घाव घालणं म्हणजे महाराष्ट्रावर घाव घालणं. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत मंगलप्रभात लोढा. त्यांनी मुंबईवर ताबा मिळवण्याची भाषा केली. त्यांची पावलं कोणत्या दिशेनं पडताहेत, तुम्ही समजून घ्या. यासाठी फाटाफूट घडवून आणता आहात का. मुंबईवर विजय मिळवण्यासाठी शिवसेनेला कमजोर केलं पाहिजे. शिवसेना दुबळी केली पाहिजे. हे फार मोठं कारस्थान, षडयंत्र आहे. तसं भाकित यापूर्वीच केलं होतं," असा आरोप राऊत यांनी भाजपवर केलाय.
“शिवसेना ही निष्ठावंताची सेना आहे. सत्तेसाठी आणि पदासाठी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणारी औलाद ही कधी शिवसेनेत निर्माण होणार नाही. जे निर्माण झाले आणि बाहेर पडले त्यांची अवस्था आपण पाहत आहात. ज्यांची नावे माध्यमातून पाहत आहे त्यातले बरेचशे आमदार वर्षा बंगल्यावर आहेत. काही मंत्र्यांशी संपर्क झाल्यावर त्यांनी आम्हाला इथे आणण्यात आल्याचे सांगितले आहे. ते आमदार गुजरात आणि सुरतमध्ये आहेत. त्यांची व्यवस्था गुजरात भाजपाचे अध्यक्ष करत आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
“ज्या क्षणी त्यांच्याशी संपर्क होईल ते परत येतील. एकनाथ शिंदे कालपर्यंत आमच्यासोबत होते. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून यावेत यासाठी ते प्रयत्न करत होते. एकनाथ शिंदे जीवाभावाचे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत जोपर्यंत बोलणे होत नाही तोपर्यंत त्यांच्याबाबत कोणतेही विधान करणार नाही,” असे राऊत यांनी सांगितले.
पुढे राऊत म्हणाले, दबाव आणण्याचे प्रकार आपल्याला माहित आहेत.आजचा मुहूर्त साधून ईडीने अनिल परब यांना बोलावले आहे. एकनाथ शिंदेशी संपर्क झाला आहे. गैरसमज असतील तर दूर करू. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. काही मतांचे हिशेब लागत नाही.