गेली सात वर्षे देशात तपास यंत्रणेचा दुरुपयोग - नवाब मलिक
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
मुंबईतील क्रूज ड्रग्ज प्रकरणापासून नवाब मलिक यांनी भाजपा, एनसीपी, समीर वानखेडे यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. यादरम्यान, नवाब मलिक यांनी विरोधकांवर, एनसीपीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर देखील अनेक आरोप केले आहे. दरम्यान, आज सकाळी नवाब मलिक यांनी आपल्या घरी छापेमारी होणार असल्याचे सूतोवाच ट्वीट करून दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
आज सकाळी नवाब मलिक यांनी केलेल्या ट्वीटची जोरदार चर्चा सुरू होती. “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माझ्याविरोधात तपास यंत्रणांना आदेश देण्यात बरेच इच्छुक दिसत आहेत. त्यांनी स्वत:ला या तपास यंत्रणांचे ओएसडी म्हणून नियुक्त करून घ्यावं. कारण त्यांना मुख्यमंत्री नियुक्त करण्याचा बराच अनुभव आहे. आणि किरीट सोमय्यांना या यंत्रणांचे प्रवक्ते म्हणून नियुक्त करावं”, असा खोचक टोला नवाब मलिक यांनी ट्वीटमधून लगावला होता. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत.
दरम्यान, यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी भाजपाला आव्हान देताना म्हटले की, राजकीय द्वेष ठेवून लोकांवर कारवाई केली जात आहे हे आता उघड होतंय. माझं म्हणणं आहे तुम्ही मागून करू नका, जबाबदारी स्वीकारा आणि कारवाई करा. आम्ही कुणाला घाबरत नाही. आम्ही थांबणार नाही.
'काही यंत्रणेतले अधिकारी मला माहिती देत राहातात. दिल्लीहून काही लोक आले होते रात्री. पण माझ्या घरी आले नाहीत. मी घरातल्या लोकांना सांगून आलो आहे की त्यांना काही चहा-बिस्किट द्या. त्यांना कारवाई करू द्या, आपण त्यांना मदत करू. पण त्यांना कळलं पाहिजे, हे सर्व अधिकारी राजकीय द्वेष ऐकत नाहीत. काही लोक या भूमिकेला विरोध करतात ही माहिती माझ्याकडे आहे, असं नवाब मलिक म्हणाले.