राज्यभरात पावसाचे पुनरागमन; पुढील ४८ ते ७२ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मुसळधार पावसाची शक्यता

राज्यभरात पावसाचे पुनरागमन; पुढील ४८ ते ७२ तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा मुसळधार पावसाची शक्यता

    पुणे , (प्रबोधन न्यूज )  -  अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात पावसाचे  पुनरागमन झाले असून गेल्या २४ तासांत राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची नोंद झालीये. कोकण ,मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात शनिवारी मुसळधार ते मध्यम पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. तर पुढील ४८ ते ७२ तासांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला येलो अलर्ट  देण्यात आलाय.

आज विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो दक्षिण कर्नाटकापर्यंत आहे. तसेच आज उत्तर बंगाल उपसागराच्या किनाऱ्यावर चक्रीय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच परिसरात येत्या ४८ तासात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात ४ तारखेनंतर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.