खालापूर येथील मुंबई पुणे द्रुतगती महामार्गवरील कामगारांच्या समस्या सोडविणार - खासदार श्रीमंत उदयंनराजे भोसले (महाराज) यांचे प्रतिपादन 

खालापूर येथील  मुंबई पुणे द्रुतगती महामार्गवरील कामगारांच्या समस्या सोडविणार - खासदार   श्रीमंत उदयंनराजे भोसले (महाराज) यांचे प्रतिपादन 


 यशवंतराव चव्हाण - मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग - एक्सप्रेस हायवेवर कार्यरत असणाऱ्या कामगारांची  द्रुतगती महामार्ग खालापुर् टोल नाका येथे सकाळी ११ च्या दरम्यान भेट घेत त्यांच्या समस्या सोडविणार असल्याचे - खासदार  श्रीमंत उदयंनराजे भोसले (महाराज) यांचे प्रतिपादन 

खालापूर, (प्रबोधन न्यूज) - छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज  खासदार  श्रीमंत उदयंनराजे भोसले (महाराज)  यानी यशवंतराव चव्हाण मुम्बई - पुणे द्रुतगती महामार्ग खालापूर पनवेल येथील  मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर कार्यरत असणा-या  कामगारांच्या  अडचणी  सोडविणार असल्याचे भेटी दरम्यान सांगितले. संपूर्ण  मुंबई पुणे   द्रुतगती महामार्ग येथील कामगारांना येत असलेल्या अडी - अड्चणी  तसेच सोयी  सुविधा आणि दिर्घकालिन प्रश्ना संदर्भात योग्य भूमिका घेण्याबाबत  भेटी दरम्यान खालापुर् टोल नाका येथे भेटी वेळी चर्चा संपन्न झाली.


मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर प्रामुख्याने स्थानिक तसेच सम्पूर्ण राज्याच्या विविध भागातिल  किबहुना संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक कामगार याठिकाणी अनेक वर्षापासून कार्यरत आहेत , या याठिकाणी प्रामाणीकपणे सेवा देत - कार्यरत  असनार्या कामगाराच्या कायमस्वरुपी पाठीशी आपण सदैव राहनार आहोत असे चर्चे दरम्यान बोलून आश्वासीत केले .
द्रुतगती महामार्ग येथिल जेष्ठ कामगार   अनंता बैलमारे तसेच रवि कासार,  प्रकाश यादव यांनी शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार छत्रपती  उदयराजे भोसले यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला . यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान 
आपण सदैव कामगारंच्या अडी अडचनी सोडविन्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असुन सतत लक्ष ठेवून राहणार असल्याचे खासदार श्रीमंत उदयंनराजे भोसले यांनी आवर्जुन सांगितले.
तसेच याठीकाणी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या  कामगारांना मिळणारे   न्याय - हक्क  सोई सुविधा- यापासून जर कोणी कोणी दुजाभाव करुन वंचित ठेवत असल्यास  त्याची गय केली जाणार नाही , असे  ते चर्चे दरम्यान म्हणाले 


या वेळी खालापुर्  IRB टोलचे जेष्ठ सुरक्षा हेड कर्मचारी  अनंता बैलमारे ,  रवी कासार तसेच महामार्ग आपत्कालीन मदत यंत्रणा जेष्ठ  निरीक्षक  प्रकाश यादव   गंगाराम पाटिल , राजेश पवार  दत्ता देशमुख आदी  असंख्य कामगार - कर्मचारी उपस्थित होते . कामगारांच्या अडी – अडचणी सोडविण्या संदर्भात राज्यसभेचे खासदार श्रीमंत छत्रपती  उदयनराजे भोसले यांचे सोबत कालच्या भेटी दरम्यान सविस्तर चर्चा सम्पन्न झाली . लवकरच आपण या संदर्भात कामगारांच्या अडचणी बाबत प्राथमिक बैठक घेऊन योग्य भूमिका  घेणार  असल्याचे  खालापुर् टोल नाका येथिल भेटीत असे ते म्हणाले .