दुसऱ्या लाटेने अवघ्या जगाला 'त्राही माम'करून सोडणाऱ्या कोरोनाच्या दार ठोठावणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जगभरात काय आहेत योजना ?  

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

दुसऱ्या लाटेने अवघ्या जगाला 'त्राही माम'करून सोडणाऱ्या कोरोनाच्या दार ठोठावणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जगभरात काय आहेत योजना ?  

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच जगभरातील अनेक देश कोरोनाची दुसरी लाट झेलून तिसऱ्या लाटेला थोपवण्याची तयारी करताहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याची स्थिती पाहायला मिळतेय. रुग्णांना ऑक्सिजन कमी पडतोय. रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्मशानांमध्ये मृतदेहांची गर्दी होतेय. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागला आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेची बातमी आली आहे. 

कोरोनाची तिसरी लाट नेमकी काय आहे ?
कोरोनाचा हा नवा प्रकार आहे. ज्याला B117 म्हटलं गेलं आहे. हे म्युटेशन पहिल्यांचा ब्रिटनमध्ये सापडलं होतं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार मूळ कोरोना विषाणूपेक्षा हा 50 टक्के अधिक संक्रमण पसरवू शकतो. शिवाय कोरोनाहूनही अधिक जीवघेणा आहे. आत्तापासूनच याला थोपवण्याची तयारी केली नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

फ्रान्समध्ये 1 कोटी नागरिकांना लस
फ्रांन्समध्ये तिसरा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्याचसोबत लसीकरणाचं कामही जोरात सुरु आहे. आतापर्यंत 1 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

नेदरलँडमधील संक्रमणामत 35% टक्के वाढ 
नेदरलँडमध्ये कोरोना संक्रमणामध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हेच पाहता डच सरकार कुठल्याही प्रकारे लॉकडाऊन हटवण्यास तयार नाही. इथं कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

जर्मनीची स्थिती बिकट
जर्मनीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे, तिथे दररोज सरासरी 29 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. 15 ते 49 वयोगटातील लोकांमध्ये सर्वाधिक संक्रमण सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच तरुण तिसऱ्या लाटेला अधिक बळी पडत आहेत. त्याचबरोबर वयोवृद्धांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आतापर्यंत जर्मनीत 80 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होणं गरजेचं
दुसऱ्या लाटेला थोपवून, तिसऱ्या लाटेची तयारी करणं भारतासाठी अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा सगळं सुस्थितीत आणायचं असेल तर मोठ्या प्रमाणात लसीकरण आणि आहेत त्या रुग्णांना बरं करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत हे होत नाही, तोवर कडक लॉकडाऊनची गरज आता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.