पिंपरी चिंचवड शहरात स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

पिंपरी चिंचवड शहरात स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा
पिंपरी चिंचवड शहरात स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा

पिंपरी  , (प्रबोधन न्यूज ) -    पिंपरी - चिंचवड शहरात सामाजिक  संस्था, संघटनांच्या वतीने  भारताचा स्वातंत्र्यदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.   आज आपला भारताचा स्वातंत्र्यदिनाचा वर्धापन दिन आपण मोठया उत्साहात साजरा करत आहोत, मागील वर्षी आपण स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सुरूवात केली आणि शहरात विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. आता अमृतमहोत्सवाच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने वाटचाल करताना

“माझी माती माझा देश” हे अभियान महापालिकेच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांतिदिनापासून राबविले जात आहे. या कार्यक्रमांमध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी तसेच शहरातील नागरिकांनी सहभाग दर्शवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सर्व शहरवासीयांना आजच्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छाही देतो असे प्रतिपादन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

पिंपरी येथील पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते सकाळी ८.१५ वाजता भारतीय राष्ट्रध्वजाचा ध्वजारोहण समारंभ संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

­यावेळी कार्यक्रमात महापालिकेच्या सुरक्षा दल, अग्निशामक दल तसेच तृतीयपंथी ग्रीन मार्शल, रिव्हर मार्शल आणि सुरक्षा दलाच्या वतीने सलामी देण्यात आली तसेच राष्ट्रगीत गायनानंतर सर्व उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, मुख्य लेखापरिक्षक राजेंद्र भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, शहर अभियंता मकरंद निकम, माजी महापौर योगेश बहल, माजी उपमहापौर राजू मिसाळ,सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, उपआयुक्त रविकिरण घोडके,  अजय चारठाणकर, यशवंतराव चव्हाण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, रामदास तांबे ,ज्ञानदेव जुंधारे, प्रमोद ओंभासे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.अभयचंद्र दादेवार, मुख्य माहिती तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, अग्निशमन अधिकारी ऋषिकेश चिपाडे , सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, बाळासाहेब खांडेकर,यशवंत डांगे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, यांच्यासह महापालिका कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे,चारुशीला जोशी तसेच कर्मचारी आणि शहरातील नागरिक उपस्थित होते.

 यावेळी तसेच स्वत:चा जीव धोक्यात घालून नागरिकांना जीवदान देणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार पदक आणि प्रशस्तिपत्रक देऊन सन्मान करण्यात आला,

महापालिका,स्मार्ट सिटी आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत ऍकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक पटकावलेल्या स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आले.. तसेच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत सकाळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिकांनी रक्तदान करून मानवतेच्या महान कार्यामध्ये सहभाग नोंदवला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि एल्प्रो सिटी स्क्वेअर मॉलच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड हेरिटेज वॉकचा शुभारंभ देखील आयुक्त तथा प्रशासक  शेखर सिंह यांच्या हस्ते संपन्न झाला  हा उपक्रम शहरातील नागरिकांना शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक मुळांशी जोडण्याचा एक दुवा असून रहिवासी आणि अभ्यासकांना शहराच्या इतिहासातील समृद्ध वारसा अनुभवता व  पाहता येईल 

      ­­दरम्यान, राष्ट्रध्वजाचा ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर निगडी भक्ती शक्ती चौक या ठिकाणी शहिद क्रांतीकारकांना अभिवादन करून देशभक्तीपर गीतांचा आणि माझी माती माझा देश सुलेखनाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात वृक्षारोपण आणि पंचप्रण शपथ घेण्यात आली यावेळी आमदार उमा खापरे ,आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, माजी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, मोरेश्वर शेडगे,उप आयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आणि हजारो नागरिक उपस्थित होते

या कार्यक्रमात “भारत देश है मेरा” ,”सारे जहा से अच्छा हिन्दोस्ता हमारा” ‘ये देश है वीर जवानोका” अशी देशभक्तीपर गीते सुप्रसिद्ध गायक विवेक पांडे, आशिष देशमुख, पृथ्वीराज इंगळे आणि गायिका राधिका अत्रे यांनी सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर चिंतन मोढा यांनी त्यांना साथ देत अप्रतिम असे संगीत संयोजन करून उपस्थितांची मने जिंकली. शेवटी सुप्रसिद्ध कॅलिग्राफर अच्युत पालव यांच्या सुरेख अशा सुलेखनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

      यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

रहाटणी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित, न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडिअम स्कूल येथे 15 ऑगस्ट उत्साहात साजरा करण्यात आला. निर्मला कुटे  यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. या निमित्ताने विविध संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार, रघुनाथ भालेराव (लेखक), नंदिनी चौधरी,संकेत कुटे, बाळासाहेब शेंडगे, रोहन भालेराव, अमोल घोलप (सामाजिक कार्यकर्ते) जितेश जगताप (सामाजिक कार्यकर्ते) तसेच ईश्वरदास पौड, घेवाराम देवाशी, शाळेच्या मुख्याध्यापिका नाजनीन शेख  उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या निमित्ताने दहावी  शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कालवश श्री विद्याधर लक्ष्मण चाबुकस्वार यांच्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच त्यांचे नावे दरवर्षी शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर करण्यात आले. इयत्ता चौथी, नववी, सातवी, तिसरी, पाचवी,सहावी, दुसरीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीत, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमांची शोभा वाढवली. सहावी  सातवीच्या विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले.“15 ऑगस्ट 1947 ला भारताला राजकीय स्वातंत्र्य मिळाले परंतु देशात माणसाला, माणसाप्रमाणे,माणूसपण मिळवून देऊन सर्वसामान्यांना  स्वातंत्र्यपणे वागण्याचा, बोलण्याचा  लिहीण्याचा हक्क मिळवून देणारे तसेच प्रत्येक व्यक्तीला विकासाची समान संधी उपलब्ध करून देणारे डॉ.भिमराव रामजी आंबेडकर यांचे मोलाचे योगदान आहे” असं मत नंदिनी चौधरी यांनी व्यक्त केले. तसेच इयत्ता आठवीच्या मुलींनी "वंदे मातरम" म्हणून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या विविध कार्यक्रमांनी सजलेल्या 15 ऑगस्ट दिनाचे विद्यार्थ्यांना खाऊवाटप  करण्यात 'आले.सूत्रसंचालन रेणू राठी मॅडम  श्वेता भालेराव यांनी केले.तसेच पाहुण्यांचे आभार कविता वाटेगावकर  यांनी केले.

श्रीमती लक्ष्मीबाई तापकीर माध्यमिक विद्यालय आणि एल बी टी इंग्लिश मिडीयम स्कूल काळेवाडी पुणे 17 या शाळेत भारताचा 76 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला . यावेळी ध्वजारोहन  सुभेदार शंकरराव बळवंतराव शिंगटे, यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सुरेश विटकर, हे होते. प्रमुख पाहुणे हवालदार अरुण आंब्रे, सज्जी वर्गीस, सागर तापकीर, सुनिल पारखे, सुरेश हगवणे  , मोहन तापकीर राजू पवार , शांताराम भोंगाळे,अशोक हजारे, एकनाथ काटे , जगदिश दत्तात्रय काटे, संजय गायके, रामकिसन वढणे, दिलीप वढणे, शहा, डी.एस. सोनार, नवनाथ थोरात, दत्तात्रय भुजबळ,मिठूभाई शेख, रामलिंग कंठेकर, प्रकाश मुरकुटे, मनोहर मोरे, दिलीप मुळे, माधव दंडीमे, नरेंद्र हेडाव , राजाराम पवार, ज्ञानेश्वर मलशेट्टी, विलास निकम, मनोहर इंगोले, हसन पटेल, सुनिल पार्टे, सुरेश पाटील, विद्यादर आबाने, विपूल मलशेट्टी, कुंदन शिंगटे , पोपट चौधरी,दिपक कुटे, महादेव चौधरी विजय रामनानी, पौलास बारसे, तसेच कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्ती पर भाषणे केली त्याचबरोबर देशभक्ती पर विविध कार्यक्रमांचे आयोजन मुख्याध्यापक शशिकांत वखार व कोयल सातपुते यांनी केले.  करण्यात आले होते.सुत्रसंचलन बापू बल्लाळ यांनी केले तर आभार शशिकांत रसाळ यांनी मानले. 

जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दहावीमध्ये प्रथम क्रमांक आलेले विद्यार्थी वरद कोलप व देवेंद्र काशिद यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. दहावी प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरवही करण्यात आला.
               यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब वरुडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, लिटल फ्लॉवर स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, अरविंद एज्युकेशन ज्युनिअर कॉलेजच्या शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पिंकी मणिकम, हेमाली जगदाळे, अमृता अमोलिक, भटू शिंदे, उदय फडतरे, अक्षय नाईक, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.
          दुसरी व चौथीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य, तसेच भाषणे केली. पहिलीतील विद्यार्थ्यानी नन्हा मुन्ना राही हे नृत्य, दुसरी व तिसरीतील विद्यार्थिनींनी ये देश है वीर जवानों का, हे नृत्य, तर आठवी व नववीतील विद्यार्थ्यांनी सलाम इंडिया हे देशभक्तीपर नृत्य सादर केले.
          प्रमुख पाहुणे नरेंद्र काशीद यांनी सांगितले, की येथील शिक्षक हे विद्यार्थ्यांचा पाया पक्का करून घेतात. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. त्यामुळे भविष्यात हेच विद्यार्थी शाळेसोबतच देशाचे नाव उज्ज्वल करतील. विशेष म्हणजे दहावीमध्ये चांगले गुण मिळाल्याने संस्थापक स्व. नानासाहेब शितोळे यांनी आपला सत्कार केला होता आणि आज याच शाळेत मुलाचा सत्कार होत आहे, हा योगायोग आहे.
           आरती राव यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्त्व सांगत भारताचे भविष्य आणखी उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. अतुल शितोळे यांनी तिरंगा ध्वज व त्याचे महत्त्व स्पष्ट करीत स्वातंत्र्य चळवळीत क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नानासाहेब वरुडे, प्रणव राव यांनी विद्यार्थ्यांना एकतेचे महत्त्व सांगत एकतेच्या जोरावर भारताला इंग्रजांच्या ताब्यातून मुक्त केले, असे सांगितले. शिक्षिका स्वाती तोडकर यांनी सूत्रसंचालन केले.