A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) - "वृद्धापकाळात हातात नुसता पैसा असून उपयोग नाही. सुख आणि समाधान आपल्या अंतःकरणातच असते म्हणून द्वेष, मत्सर, जातीयता अशा नकारात्मक भावना टाळून अन् माणुसकीचा धर्म जोपासून निरपेक्ष आनंद मिळवा!" असे आवाहन आकाशवाणी कलावंत आणि ज्येष्ठ साहित्यिक रमेश इनामदार यांनी व्यक्त केले.
पिंपरी - चिंचवड निवृत्त संघटना, चिंचवडगाव शाखा आयोजित कार्यक्रमात रमेश इनामदार अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना बोलत होते. पिंपरी - चिंचवड निवृत्त संघटना, चिंचवडगाव शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार, ऑगस्ट महिन्यात वाढदिवस असलेल्या तसेच वयाची ७५ आणि ८० वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा अभीष्टचिंतनपर सत्कार असे कार्यक्रमाचे स्वरूप होते. नूतन कार्यकारिणी रमेश इनामदार (अध्यक्ष), चंद्रकांत कोष्टी (उपाध्यक्ष), नीलिमा जोशी (कार्यवाह), नामदेव तारू (सहकार्यवाह), गंगाधर जोशी (कोषाध्यक्ष), दीपक रांगणेकर (सहकोषाध्यक्ष), श्रीकांत पानसे (अर्थसल्लागार) तसेच महिला सदस्य म्हणून शैलजा कुलकर्णी, जयश्री गोवांडे, प्रियांका केळकर आणि कार्यकारिणी सदस्य म्हणून रमेश डोंगरे, मोरेश्वर देशपांडे, अरुण घोलप, राजेंद्र भागवत, उत्तम जगताप या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. याप्रसंगी दीपक रांगणेकर, रमेश देव, शुभदा कुलकर्णी, निवृत्ती पानसरे, सखाराम देशपांडे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. मदनलाल बागमार, सिंधू नाईक, उषा गर्भे, अशोक घोडेकर, व्यंकटेश कुलकर्णी, प्रकाश देशपांडे, बालमुकुंद भावसार, रामचंद्र जगताप, सरस्वती सावरकर, मेधा गोडसे यांचे वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल आणि आसावरी चिंचणकर यांचे वयाची ८० वर्षे पूर्ण केल्याबद्दल अभीष्टचिंतन करण्यात आले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू न शकलेल्या सत्कारार्थींचे अभीष्टचिंतन त्यांच्या निवासस्थानी जाऊन करण्यात येणार आहे. सत्कारार्थींच्या वतीने प्रातिनिधिक मनोगते व्यक्त करण्यात आलीत. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ आणि वंदे मातरम् ने सांगता करण्यात आली. नीलिमा जोशी यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.