निमित्त 'हवा येऊ द्या'चे आणि संकल्प सत्ताधाऱ्यांची हवा काढण्याचा ! भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकजुटीची मोट !

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

निमित्त 'हवा येऊ द्या'चे आणि संकल्प सत्ताधाऱ्यांची हवा काढण्याचा ! भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकजुटीची मोट !
भोसरी -
यंदा पक्षातील सर्वांनी एकत्र येऊन खोटी हवा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांची हवा काढून घ्यायचीच, असा संकल्प भोसरीत राष्ट्रवादी काँग्रेसने केला. निमित्त होते, लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीतील गावजत्रा मैदानावर आयोजित केलेल्या 'चला हवा येऊ द्या' या मनोरंजनपर कार्यक्रमाचे ! मात्र, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आणि आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी यानिमित्ताने एकत्र येत आपली मोट बांधून भोसरीत चांगलीच हवा निर्माण केली. 
या कार्यक्रमाला शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर मोहिनी लांडे, ज्येष्ठ नेते योगेश बहल, नगरसेवक अजित गव्हाणे, रवि लांडगे, माजी नगरसेक जालिंदर शिंदे, पंडित गवळी, नगरसेवक संजय वाबळे, उद्योजक भरत लांडगे, नगरसेवक विक्रांत लांडे, नाना काटे, मयूर कलाटे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, नगरसेविका अनुराधा गोफणे, वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, डॉ. श्रद्धा लांडगे, उद्योजक संजय उदावंत, देविदास गोफणे, विराज लांडे, योगेश गवळी, युवकचे प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, शहराध्यक्ष विशाल वाकडकर, निहाल पानसरे, भोसरी राष्ट्रवादी युवकचे प्रमुख अमित लांडगे, वर्षा जगताप आदी उपस्थित होते. 

यावेळी उपस्थितांना पर्यावरण संवर्धनासाठी ‘वसुंधरेची शपथ’ देण्यात आली. जालिंदर शिंदे यांच्या छावा संघटनेच्या संभाजी महाराज यांच्या जीवनपटाची माहिती असलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. अखिल भारतीय बैलगाडा संघटना, बैलगाडा मालकांना न्याय मिळवून दिल्यानिमित्त अखिल भारतीय बैलगाडा मालक संघटनेच्या वतीने खासदार डॉ. कोल्हे यांना बैलगाड्याची प्रतिकृती भेट दिली.

शरद पवारसाहेब यांचे  कार्यकर्तृत्व तर अजितदादा यांची विकासाभिमुख वाटचाल चलचित्र फिल्मद्वारे दाखविण्यात आली. यावेळी लोकनेते शरद पवार, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नावावर दोन बाऱ्या सोडण्यात आल्या. 

खासदार डॉ. अमोल कोल्हे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बैलगाडा मालकांच्या बाजूने लागला. इतके वर्ष सहनशीलता राखून संसदेत विविध माध्यमातून हा प्रश्न मांडत होतो. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने पुढाकार घेतला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे आभार मानतो. अजून काही लढाई बाकी आहे. पाच सदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी व्हायची आहे. त्यासाठी संसदीय, न्यायालयीन मार्गे दोन्ही प्रकारे लढाई लढाईची आहे. 

माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांच्या कारभाराची नस शहरातील नागरिकांनी ओळखली आहे. भाजपने एकही मोठा प्रकल्प केला नाही. अनेकसंकटांवर मात करत शरद पवारसाहेबांनी पिंपरी-चिंचवडचे नाव देश, जगाच्या नकाशावर नेले. घरकुल, ग्रेडसेपरेटर, उड्डाणपुल केले. कुस्ती प्रदर्शन मैदान केंद्राचे भूमीपूजनही पवार साहेबांच्या हस्ते झाले. शहर वाचवण्यासाठी राष्ट्रवादीला साथ द्यावी. बैलगाडा शर्यत बंद झाली होती. ती चालू करण्याचे काम खा. कोल्हे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजेच खोटी हवा करणाऱ्यांची हवा काढून घ्यायची आहे. 

नगरसेवक अजित गव्हाणे यावेळी बोलताना म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट झाला. भोसरीतील उड्डाणपुल, अंकुशराव लांडगे नाट्यगृह, भोसरी रुग्णालय, उद्यान, कुस्ती केंद्र ही सर्व कामे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत. पिंपरी-चिंचवड आणि भोसरीचा जो विकास झाला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. भोसरीच्या विकासासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. 'संकल्प एकजुटीचा, भोसरीच्या शास्वत विकासाचा' या ब्रीद वाक्यावर शिक्कामोर्तब करत भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एक भक्कम फळी भोसरीत उभारण्यात येत आहे. विलास लांडे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरीचा शास्वत विकास करण्याचा आमचा निर्धार असल्याचे गव्हाणे म्हणाले.