राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडून ‘‘मानव सेवा हिच ईश्वर सेवा’’ चा संदेश! - भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या भावना
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
- प्रा. डॉ. तानाजी सावंत, प्रा. शिवाजी सावंत यांचे अभिनंदन
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - महाराष्ट्र राज्याचा आरोग्य विभाग आणि पुणे, सातारा आणि सोलापूर या तीन जिल्हा परिषदांच्या आरोग्य विभागाच्यावतीने यंदाच्या आषाढी वारीनिमित्त ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमांतर्गत आरोग्य वारीत ११ लाखांहून अधिक वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. मानव सेवा हिच ईश्वर सेवा असा संदेश आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी दिला आहे, अशा भावना भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत व प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून आषाढी वारी निमित्त पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या “आरोग्याची वारी पंढरीच्या दारी” महाआरोग्य शिबिराची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेण्यात आलेली आहे व त्याबद्दल त्यांना International World Record of Excellence, Book of Records वतीने सन्मानित करण्यात आले आहे.
पंढरपूर येथे आषाढी एकादशी सोहळ्यानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाने वारकऱ्यांची आरोग्य तपासणीचा ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ उपक्रम राबविला होता. महाराष्ट्राच्या सक्षम आणि सुदृढ आरोग्यासाठी कार्य करत असलेले आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत व प्रा. श्री. शिवाजीराव सावंत यांचे कार्य खरंच कौतुकास्पद असल्याने राज्याच्या जनतेकडून आणि पांडुरंगाच्या वारकऱ्यांकडून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
एकूण ११ लाख ५७ हजार वारकऱ्यांची सेवा…
आषाढी एकादशीनिमित्त देहू-आळंदी ते पंढरपूर दरम्यान निघालेल्या पालखी मार्गावर 6 लाख 64 हजार 607, तर पंढरपूर येथील महाआरोग्य शिबिरांमध्ये 5 लाख 77 अशा एकूण 11 लाख 57 हजार 684 वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचारात्मक आरोग्य सेवा पुरवून सार्वजनिक आरोग्य विभागाने विक्रमी कामगिरी केली होती. देहू-आळंदी ते पंढरपुर या पालखी मार्गावर आणि पंढरपूर येथे वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी 27 ते 29 जून 2023 या कालावधीत वाखरी, गोपाळपूर व तीन रस्ता येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरांच्या माध्यमातून आरोग्य विभागामार्फत विविध आरोग्य विषयक सेवा पुरविण्यात आल्या होत्या त्याच सेवा कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.