पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा सात लाखांचा मुद्देमाल नष्ट

पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर पोलिसांचा छापा  सात लाखांचा मुद्देमाल नष्ट

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पवना नदीच्या काठावर सुरु असलेल्या दारूभट्टीवर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. यात पोलिसांनी सात लाख 15 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 17) दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस शिपाई सदानंद रुद्राक्षे यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका 27 वर्षीय महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरगाव येथे पवना नदीच्या काठावर एका महिलेने बेकायदेशीरपणे दारूभट्टी लावली असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार सदानंद रुद्राक्षे व प्रदीप शेलार यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दारूभट्टीवर गुरुवारी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास छापा मारून कारवाई केली.

या कारवाई मध्ये पोलिसांनी 10 हजार लिटर कच्चे रसायन, 30 गुळाच्या ढेपी असा एकूण सात लाख 15 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी महिला पळून गेली. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.