सुरक्षा रक्षकाला महिलेने लगावले कानाखाली,महिलेवर गुन्हा दाखल

सुरक्षा रक्षकाला महिलेने लगावले कानाखाली,महिलेवर गुन्हा दाखल

  पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -  कर्तव्य बजावत असणाऱ्या सरकारी सुरक्षा रक्षकाला इनका रोज का नाटक है म्हणत महिलेने थेट कानाखाली मारले. ही घटना पिंपरीतील डी .वाय.पाटील रूग्णालयात बुधवारी ( दि.16) घडली.

या प्रकरणी अतुल महादेव भांगीरे (वय 27 रा.भोसरी) यांनी गुरूवारी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरून पोलिसांनी महिलेवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे सुरक्षा रक्षक आहेत. ते पिंपरीतील डी. वाय .पाटील रूग्णालयात मेनगेटवर कर्तव्य बजावत होते. यावेळी गाडीमधून आलेल्या महिलेने इनका रोज का है म्हणत गाडी खाली उतरून फिर्यादी यांच्या तीन कानाखाली लागावल्या.तसेच मैं और क्या कर सकती  हुं देख लेना अस म्हणत धमकी दिली.पिंपरी पोलीस तपास करत आहेत.