नाणोली येथे घरातून तीन मोबाईल फोन चोरीला

नाणोली येथे घरातून तीन मोबाईल फोन चोरीला

    पिंपरी , (प्रभोधन न्यूज )   -   मावळ तालुक्यातील नाणोली येथे घरातून तीन मोबाईल फोन चोरीला गेले. ही घटना मंगळवारी (दि. 4) सकाळी पावणे पाच वाजता उघडकीस आली.

राजाभाऊ किसन आडागळे (वय 46, रा. नाणोली, ता. मावळ) यांनी याप्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराची खिडकी उचकटून खिडकीत ठेवलेले 26 हजारांचे तीन मोबाईल फोन चोरट्यांनी चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.