भांडणे सोडवायला आलेल्या सासऱ्यालाच जावयाने घेतला चावा  

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

भांडणे सोडवायला आलेल्या सासऱ्यालाच जावयाने घेतला चावा  

  

   पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) -   पोटच्या मुलीला मारहाण होताना पाहून बापाला रहावले नाही म्हणून ते जावई अन मुलीच्या भांडणात पडले.. पण जावयाने सारा राग सासऱ्यावर काढला अन थेट त्यांच्या गालाचा अन पाठीचाच चावा घेतला. हि घटना चिंचवड येथे मंगळवारी घडली आहे.

याप्रकरणी सासऱे शिवाजी लक्ष्मण कुचेकर (वय 52 रा.चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून जावई आदेश प्रकाश कुचेकर (वय 25 रा. चिंचवड) याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या मुलीच्या घरी मुक्कामी राहिले होते. रात्री झापले असताना जावई व मुलीमध्ये भांडण सुरु झाले. या भांडणात जावयाने  मुलीला मारहाण कऱण्यास सुरुवात केली. मुलीला होणारी मारहाण थांबवण्यासाठी फिर्य़ादी भांडणे सोडविण्यासाठी गेले.मात्र रागात असलेल्या जावयाने मध्यस्थी करणाऱ्या सासऱ्यावरच राग काढला अन त्यांच्या कानाला, गालावर व पाठीवर चावा घेतला व मारहाण केली. तसेच धमकी दिली. यावरून सासऱ्यांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. चिचंवड पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत.