शाश्वत अर्थव्यवस्थेसाठी सामाजिक समतोल, पर्यावरण संवर्धनाचे व्यवस्थापन आवश्यक डॉ. अरुण जोशी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
एसबीपीआयएमच्या राष्ट्रीय परिषदेत देशभरातील विद्यार्थ्यांचा सहभाग
पिंपरी, - कोरोना सारख्या अचानकपणे उद्भवणाऱ्या जागतिक मारामारीचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला. भारतीय अर्थव्यवस्थेला यातून बाहेर येण्यासाठी आणि भारत देश महासत्ता होण्यासाठी योग्य मनुष्यबळ, पूरक उपयोजना, समाजाचा आर्थिक, सामाजिक समतोल आणि पर्यावरण संवर्धन यांचे दूरदृष्टी ठेवून उत्कृष्ट व्यवस्थापन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन मध्यप्रदेशातील खांडवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जोशी यांनी केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे "महामारी पूर्व आणि नंतरच्या काळात चक्राकार अर्थव्यवस्थेसाठी शाश्वत वित्त" या विषयावर आयोजित केलेल्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. अरुण जोशी बोलत होते.
यावेळी एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर, पीसीईटी च्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. जान्हवी इनामदार डॉ. नीरज दुबे, सुबोध संत, डॉ. भूषण परदेशी, परमजीत चड्डा आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती आणि आजादी का अमृत महोत्सव या विषयावर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. तसेच व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या राष्ट्रीय परिषदेत देशभरातून संशोधक, अभ्यासक, शिक्षक व व्यवस्थापन शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. अरुण जोशी म्हणाले की, उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे आज जग खूप जवळ आले आहे. असे आपण नेहमी म्हणतो, ते काही अंशी सत्य आहे. याचे काही फायदे तोटे देखील आहेत. एखाद्या विकसित, विकसनशील देशावर युद्ध किंवा नैसर्गिक आपत्ती सारखे संकट आले तर त्याचे दूरगामी परिणाम त्या देशाबरोबरच इतर अनेक देशांवर होतात. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सुनियोजित व्यवस्थापन आणि अनुभवी मनुष्यबळ उपयोगी असते त्यादृष्टीने धोरणे आखणे आवश्यक आहे.
एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. किर्ती धारवाडकर म्हणाल्या की, आर्थिक वृद्धी आणि अपेक्षित विकास दर साध्य करीत असताना आता पर्यावरणाचा ऱ्हास रोखणे आणि पर्यावरणाचे संवर्धन करणे ही बाब देखील महत्वाची आहे. यासाठी प्रत्येकाने वैयक्तिक जबाबदारी समजून साधनांचा सुयोग्य वापर करून पर्यावरण संवर्धन करण्यासाठी हातभार लावावा.
प्रास्ताविक डॉ. अनिष कारीया, सूत्र संचालन ऐश्वर्या गोपीनाथन, आभार डॉ.भूषण परदेशी यांनी मानले.