पिंपरीतील डोंगरे, तळेगाव मधील परदेशी आणि भोसरीतील मोतीरावे टोळ्यांवर मोका
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - पिंपरी परिसरातील यशवंत डोंगरे टोळी, तळेगाव दाभाडे परिसरातील सुधीर परदेशी टोळी आणि भोसरी परिसरातील सौरभ मोतीरावे या तीन टोळ्यांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोका) कारवाई करण्यात आली आहे. एकाच वेळी तीन टोळ्यांवर ही कारवाई झाल्याने शहर परिसरातील गुन्हेगारांची चांगलीच तंतरली आहे.
पिंपरी परिसरातील टोळी प्रमुख यशवंत उर्फ अतुल सुभाष डोंगरे (वय 22), सुशांत उर्फ दगडी आणणा अनिल जाधव (वय 19), आकाश रंजन कदम (वय 21), शुभम कैलास हजारे (वय 25), सुशांत उर्फ भैया आजिनाथ लष्करे (वय 22), मयूर प्रकाश परब (वय 22), कृष्णा धोंडीराम शिंदे (वय 25, सर्व रा. पिंपरी), अजिंक्य अरुण टाकळकर (वय 21, रा. मोशी) या टोळीवर गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.
तळेगाव दाभाडे परिसरातील टोळी प्रमुख सुधीर अनिल परदेशी (वय 25, रा. केशवनगर, वडगाव मावळ), विवेक नंदकिशोर लाहोटी (वय 42, रा. शाहूनगर, चिंचवड), प्रतीक्षा विक्रांत भोईर (वय 29, रा. केशवनगर, वडगाव मावळ), शरद मुरलीधर साळवी (वय 30, रा. काळेवाडी, पुणे. मूळ रा. जालना), भाऊ (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या टोळीवर सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत.
भोसरी परिसरातील टोळी प्रमुख सौरभ संतुराम मोतीरावे (वय 20, रा. आळंदी), आकाश गोविंद शर्मा (वय 22, रा. भोसरी), राम सुनील पुजारी (वय 21, रा. मोशी), ओमकार मल्हारी दळवी (रा. दिघी) या टोळीवर सहा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
या तिन्ही टोळ्यांमधील आरोपींवर पिंपरी, चाकण, तळेगाव दाभाडे, भोसरी, कोपरगाव पोलीस ठाण्यांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, जबरी चोरी, दुखापत करून जबरी चोरी करणे, पुरावा नष्ट करणे, दुखापत करणे, घरात घुसून मारहाण करणे, गैरकायद्याची मंडळी जमवणे, बेकायदेशीररीत्या घातक शस्त्रे जवळ बाळगणे, गाड्यांची, सामानाची तोडफोड व जाळपोळ करून नुकसान करणे, दहशत निर्माण करणे, दहशत माजवून नागरिकांना वेठीस धरणे असे गुन्हे दाखल आहेत. याबाबत तीनही टोळ्यांवर मोकाची कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर आयुक्त विवेक परदेशी, उपायुक्त (गुन्हे) स्वप्ना गोरे, उपायुक्त (परिमंडळ एक) विवेक पाटील, सहायक आयुक्त (गुन्हे) सतीश माने, सहायक आयुक्त (गुन्हे एक) बाळासाहेब कोपनर, सहायक आयुक्त (देहूरोड) पद्माकर घनवट, सहायक आयुक्त (पिंपरी) सतीश कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक निरीक्षक अंबरीश देशमुख, उपनिरीक्षक सुहास खाडे, पोलीस अंमलदार सचिन चव्हाण, व्यंकप्पा कारभारी, अनिल गायकवाड, ओंकार बंड, दत्ताजी कौठेकर, सागर शेंडगे, विनोद वीर, मच्छिंद्र बांबळे, संदीप जोशी यांच्या पथकाने केली आहे.