एमआयडीसीमधील वाढत्या समस्या मार्गी लावण्याची मागणी
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे सुरु आहेत. सुमारे सहा हजार उद्योजक महापालिकेला कर देतात. या कररुपी पैशांमधून एमआयडीसी परिसरात मूलभूत सुविधा निर्माण करण्याची सर्व उद्योजकांची अपेक्षा आहे. मात्र ही अपेक्षा पूर्ण करण्यास प्रशासन असमर्थ दिसत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करुन उद्योग क्षेत्रातील समस्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी भाजपा नगरसेविका नम्रता लोंढे यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील उद्योजक अनेक समस्यांना तोंड देत आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे अस्वच्छता, दुर्गंधी पसरली आहे. फूटपाथवर झालेल्या अतिक्रम आणि फूटपाथच्या बिकट अवस्थेमुळे नागरिकांना त्यावरून चालता येत नाही. अंतर्गत रस्त्यांवर नियमितपणे झाडलोट होत नाही, त्यामुळे कचरा वाढत आहे.
एमआयडीसी परिसरात सुरु असलेले अनधिकृत धंदे, वाढत्या चोरीच्या घटना, अनधिकृत भंगार दुकाने, अनेक ठिकाणी होणारी बेकायदेशीर दारूविक्री अशा अनेक समस्या आहेत. महिला कामगारांसाठी सार्वजनिक शौचालय नाही. महिला कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. कंपन्यांचे पाणी मलनिस्सारण करण्यासाठी ड्रेनेज नाही. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता महापालिका आणि एमआयडीसी एकमेकांकडे बोट दाखवतात. एमआयडीसी मधील उद्योजकांच्या मागण्यांकडे प्रशासनाने वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणीही नगरसेविका लोंढे यांनी केली आहे.