पिंपळे सौदागरमध्ये भुस्खलनामुळे रस्ता खचला, वाहतूक बंद
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी , (प्रबोधन न्यूज ) - राज्यात मुसळधार पावसानं अक्षरश: थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तर मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये सखल भागांत मोठ्या प्रमाणत पाणी साचलं आहे. मुसळधार पावसानं वाहतुकीचे तीन तेरा झाले आहेत. नागरिकांची दाणादाण उडाली आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरातील उच्चभृ सोसायटी समोरील रस्ता खचल्याची घटना समोर आली आहे. सोसायटीना पाणीपुरवठा करणाऱ्या पाईप लाईन तुटल्या, रहदारीला मोठी अडचण रस्ता खचल्याने निर्माण झाली आहे. प्लॅनेट मिलेनियम सोसायटी समोर ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
रस्त्यात असलेली पाणी पुरवठा लाईन व स्टॉम वॉटर लाईन देखील तुटली आहे. पहाटेच्या वेळी ही संपुर्ण घटना घडली आहे. माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, शत्रुन्घ काटे, निर्मला कुटे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी संबंधिक बांधकाम व्यावसायीक, मनपा अधिकारी, पाणी पुरवठा विभाग व पोलीस प्रशासनास सांगुन त्वरीत उपाययोजना करण्यास सांगितले आहे.