प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन

प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन

तळेगाव,  (प्रबोधन न्यूज )  - मराठी सिनेसृष्टीवर आघात करणारी बातमी नुकतीच समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र हनुमंत महाजनी यांच निधन झालं आहे. 80 चा काळ गाजवणारा लोकप्रिय अभिनेता म्हणजे रविंद्र महाजनी त्याकाळी मराठीतील हँडसम हंक म्हणून रविंद्र महाजनी यांच्याकडे पाहिलं जायचं. आज ते आपल्यात नाहीत, त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप समोर आलेलं नाही.

मावळच्या तळेगाव दाभाडील आंबी येथील घरात शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळून आला. रवींद्र यांचं वय 77 वर्ष होतं. त्यांचा मृत्यू साधारण: तीन दिवसांपूर्वी झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने सर्वानाच धक्का बसला आहे. लोकप्रिय अभिनेत्याचा असा शेवट झाला आहे, हे खूपच वेदनादायी आहे. अभिनेत्री परवीन बाबी हिचा देखील अशाप्रकारे शेवट झाला होता.

'मुंबईचा फौजदार', 'झुंज', 'कळत नकळत', 'आराम हराम' अशा कितीरी सिनेमांमधील त्यांच्या भूमिका सुपरहिट झाल्या. परंतु, मराठीतील या एव्हरग्रीन अभिनेत्याने त्याच्या करिअरची सुरुवात चक्क टॅक्सी चालवून केली होती. हे फार कमी जणांना माहित आहे. त्यामुळेच त्यांच्या या प्रवासाविषयी जाणून घेऊयात.अभिनय क्षेत्रात येणाऱ्या पूर्वी रविंद्र महाजनी खरोखर एक टॅक्सी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. त्यांनी जवळपास 3 वर्ष त्यांनी मुंबईत टॅक्सी चालवली. पण, त्यांच्यातील कलाकार त्यांना स्वस्थ बसू देईना. त्यामुळे ते दिवसा वेगवगेळ्या ठिकाणी जाऊन निर्मात्यांच्या भेटी घेत. आणि, रात्री टॅक्सी चालवत.
रविंद्र महाजनी मध्यमवर्गीय कुटुंबातील होते मात्र, ते टॅक्सी चालवतात या एका गोष्टीमुळे त्यांच्या अनेक नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले. विशेष म्हणजे ज्यावेळी ते अभिनेता म्हणून नावारुपाला आले त्यावेळी त्यांचे हेच नातेवाईक पुन्हा त्यांच्याशी नीट वागू लागले.

दरम्यान, रविंद्र महाजनी यांनी मराठीसह हिंदी, गुजराती सिनेमांमध्येही काम केलं आहे. रविंद्र महाजनी यांनी व्ही. शांताराम यांच्या झुंज या सिनेमातून कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी ‘लक्ष्मी’, ‘दुनिया करी सलाम’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’ यांसारख्या सिनेमात काम केलं. इतकंच नाही तर बॉलिवूडमध्येही ते झळकले आहेत. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’ या सिनेमातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

गश्मिर महाजनी हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे. तो देखील चित्रपट क्षेत्रात आघाडीचा अभिनेता आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. देखणेपण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर अभिनेते महाजनी यांनी 1975 ते 1990 चा काळ त्यांनी गाजवला.