पालिका गुणवंत विद्यार्थी सत्कार योजना धोरण राबविणार आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) -महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 10 वी शालांत प्रमाणपत्र परिक्षेत 80 टक्के पेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना व दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस रक्कम ईसीएसद्वारे देण्यासह गुणवंत विद्यार्थी सत्कार योजना धोरण राबविण्यासाठी येणा-या खर्चाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आयुक्तांनी मान्यता दिली. बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते. यावेळी मनपाच्या विविध रुग्णालयांमध्ये महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांचेकडील 77 सुरक्षा रक्षकांचे नियुक्तीबाबत नव्याने करारनामा करणे व येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग 19 चिंचवड (वार्ड सेंटर) येथे पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालय सिटी ऑपरेशन व डिजास्टर रिकव्हरी सेंटर विकसित करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. जेएनएनयुआरएम शहर झोपडपट्टी पुर्नवसन अंतर्गत लिंकरोड पत्राशेड पॅकेज क्रमांक 7 अ मधील इमारतींची स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, जलनि:सारण कामांची दुरूस्तीची कामे करणेकामी तसेच अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विभाग 10 अंतर्गत मोरवाडी येथे कॉक्रीटकरण करणे कामात अडथळा ठरणारे विद्युत कंपनीचे उच्चदाब व लघुदाब वाहिनी व पोल स्ट्रक्चर हलविणे व अनुषांगिक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या शिक्षण व रुग्णालय विभागासाठी कॉम्प्युटर टेबल खरेदी करणेकामी मान्यता देण्यात आली. मालमत्ता कर सवलत योजनेसाठी जनजागृती करणेकामी, रिक्षा स्पीकर सेटसह पुरविणेबाबत मान्यता देण्यात आली.
पालिकेच्या आरोग्य विभागासाठी बायोलॉजिकल मल्टीपरपज रॅपीड ऑक्सीजीनेटेड पावडर खरेदी करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. आरोग्य विभागासाठी डीओड्रन्ट्स (डिसइन्फेक्टंट्) खरेदी करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली. क्रांतीवीर चापेकर वाडा येथे ऑडिओ-व्हिडीओ व्हिज्वुल, प्रोजेक्शन मॅपिग व विविध डिजीटलायझेशन विषयक कामकाज करणेसाठी सल्लागार नेमणूक करण्यास मान्यता दिली.