पिंपरी- चिंचवड शहरात 3 ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसविणार
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी -
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने शहरात हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील डांगे चौक, भोसरी आणि जगताप डेअरी या 3 ठिकाणी ही यंत्रणा बसविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक जागा महापालिकेने प्रदूषण नियंत्रण मंडळाला उपलब्ध करून दिली आहे. पुढील दीड महिन्यांत ही यंत्रणा शहरात उभारली जाईल. त्यामुळे हवेची गुणवत्ता मोजण्याबरोबरच शहराचे तापमान आणि हवामान समजू शकणार आहे.
शहरामध्ये महापालिका प्रशासन अथवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसविण्यात आली नव्हती. पहिल्यांदाच अशी यंत्रणा शहरात प्रदूषण नियंत्रण मंडळाद्वारे बसविण्यात येत आहे. यापूर्वी ‘आयआयटीएम’ या संस्थेकडून शहरात 3 ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसविलेली आहे.
पिंपरी, चिंचवड आणि भोसरी येथे यंत्रणा आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यभरात विविध ठिकाणी हवेची गुणवत्ता मोजणारी यंत्रणा बसविली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात ही यंत्रणा बसविण्यात येत आहे. त्याबाबतची निविदा मंजूर झाली आहे. प्रत्यक्ष कामही सुरू झाले आहे.
डांगे चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भोसरी येथील रोझ गार्डन आणि जगताप डेअरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान येथे ही यंत्रणा उभारली जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून तापमान, आर्द्रता, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड, हवामान आदी मोजणारी यंत्रणा त्यामध्ये असणार आहे. ही यंत्रणा उभारण्यासाठी महापालिकेने 3 ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली आहे. प्रत्येक ठिकाणी यंत्रणा उभारण्यासाठी एक ते सव्वा कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.