जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागला ! 21 जागांसाठी तब्बल 299 अर्ज 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

जिल्हा बँकेच्या निवडणुकांचा कार्यक्रम लागला ! 21 जागांसाठी तब्बल 299 अर्ज 
पुणे - 
ग्रामीण भागाची आर्थिक नाडी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळांच्या 21 जागांसाठी 299 उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आंबेगाव तालुक्यातून सोसायटी ‘अ’ वर्ग गटातून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. आठ मतदार संघातील तब्बल 5 हजार 166 मतदार या निवडणुकीत मतदान करणार आहेत. बँकेच्या 21 जागांसाठी 299 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सोसायटी अ वर्ग गटासह यावेळी अन्य सर्व गटांमध्ये चुरस आहे. भाजपच्या वतीने बहुतेक सर्व जागांवर उमेदवारी अर्ज दाखल करून राष्ट्रवादी काँग्रेस समोर सध्या तरी आव्हान उभे केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार या विद्यमान संचालकांसह अन्य सर्व विद्यमान संचालक निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.

असा असेल निवडणूक कार्यक्रम
– उमेदवारी अर्ज मागे घेणे : 8 डिसेंबर ते 22 डिसेंबर
– जिल्हा बँकेसाठी मतदान : 2 जानेवारी 2022
– मतमोजणी : 4 जानेवारी 2022
बँकेचे संचालक मंडळ : 21
– अ मतदार संघ (तालुका प्रतिनिधी) : 13
– ब मतदार संघ : 1
– क मतदार संघ : 1
– ड मतदार संघ : 1
– अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ : 1
– इतर मागासवर्गीय प्रतिनिधी : 1
– विभक्त जाती व प्रजाती : 1
– महिला प्रतिनिधी : 2

या सगळ्या गोष्टी सुरु असताना नवीन सहकार कायद्यानुसार किती अर्ज भरावे याला मर्यादा नाहीत. या नियमाचा गैरफायदा घेत जुन्नर तालुक्यातील विद्यमान संचालक, माजी उपाध्यक्ष संजय काळे यांनी चक्क 55 उमेदवारी अर्ज विकत घेऊन तब्बल 34 उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे समोर आले आहे.