A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
पिंपरी, (प्रबोधन न्यूज ) - गेल्या काही वर्षांत विज्ञान व माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची भरपूर प्रगती झाली आहे. माहिती तंत्रज्ञानामध्ये ॲनिमेशनचा वापर वाढला असून हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ॲनिमेशन क्षेत्रामध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध झाल्या आहेत. रिलायन्स ॲनिमेशन्सने भविष्यातील गरज ओळखून ॲनिमेशन मध्ये नव नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु) आणि रिलायन्स ॲनिमेशन्स यांच्यामध्ये झालेल्या शैक्षणिक सामंजस्य करारामुळे पीसीयुच्या विद्यार्थ्यांनाही नवीन तंत्रज्ञान शिकण्याची संधी उपलब्ध झाली आहे,असे मत रिलायन्स ॲनिमेशन्सचे सीईओ तेजोनिधी भंडारे यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयु), साते मावळ येथील मुख्यालयात पीसीयु आणि रिलायन्स ॲनिमेशन्स यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी भंडारे बोलत होते. यावेळी या कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, उप कुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज, डॉ. सागर भडंगे, प्रा. रुचू कुठयाला आदी उपस्थित होते.
डॉ. मनिमाला पुरी म्हणाल्या, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड विद्यापीठाने साते, मावळ येथील विस्तीर्ण जागेत काळाची गरज ओळखून संगणक अभियांत्रिकी, कृत्रिम बुद्धिमत्ता, औषध निर्माण शास्त्र आदी अनेक शैक्षणिक शाखा सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रिलायन्स ॲनिमेशन्स यांच्याबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केला आहे. येत्या काळात पीसीयुच्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल.
डॉ. राजीव भारद्वाज यांनी पीसीईटीच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती दिली. पीसीईटी शैक्षणिक संकुलाने आंतरराष्ट्रीय स्तरावर चोवीस शैक्षणिक संस्था, विद्यापीठां बरोबर सामंजस्य करार केले आहेत. पीजी ते पीएचडी पर्यंतचे शिक्षण पीसीईटीच्या महाविद्यालयात उपलब्ध आहे असे डॉ. भारद्वाज यांनी सांगितले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त आणि पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी, उप कुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत आणि सूत्रसंचालन प्रा. रुचू कुठयाला यांनी केले. आभार डॉ. सागर भडंगे यांनी मानले.