समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात? 

समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात? 
समीर वानखेडेंची मेहुणी ड्रग्ज व्यवसायात? 

नवाब मलिकांच्या नव्या ट्विटने खळबळ

मुंबई :

कार्डेलिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप करत आहेत. आज त्यांनी वानखेडेंच्या मेहुणीवर निशाणा साधला आहे. वानखडेंची मेहुणी म्हणजेच अभिनेत्री क्रांती रेडकरच्या बहिणीचे पुण्यातील कोर्टात ड्रग्ज प्रकरण प्रलंबित आहे. त्याचे उत्तर वानखेडेंनी द्यावे, असे मलिकांनी म्हटले आहे.

मलिक यांनी यासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, समीर दाऊद वानखेडे, तुमची मेहुणी हर्षदा दिनानाथ रेडकर ही ड्रग्जच्या व्यवसायात सामील आहे की काय? त्याचा समीर वानखेडेंनी खुलासा करावा. कारण तिच्याविरोधातली केस पुणे कोर्टात प्रलंबित आहे. मलिकांनी ट्विटमध्ये ई- कोर्ट सर्व्हिसवरील फोटो शेअर करत हा पुरावा असल्याचा दावाही केला आहे.