केजुबाई बंधारा फेसाळला

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

केजुबाई बंधारा फेसाळला
पिंपरी , (प्रबोधन  न्यूज ) -  छायाचित्रे पाहिल्यास हे जम्मू काश्मीरचे चित्र आहे का, असे तुम्हाला वाटेल. पण, ते आपल्या  पवना नदीवरील थेरगाव येथील केजुबाई बंधाऱ्यातील चित्र आहे. जोरदार पाऊस पडत असतानाही बंधारा फेसळला आहे. मोठ्या प्रमाणात पाण्यात फेस निर्माण झाला आहे. आजूबाजूच्या कंपन्यांनी रसायन मिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्याची शंका व्यक्त केली जात असून याची चौकशी करून कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस असल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 
पिंपरी-चिंचवड शहरात बुधवारी दिवसभर जोरदार पाऊस पडत होता. रात्रीही पावसाचा जोर कायम होता. पाऊस जोरदार पडल्याने पवना नदीपात्र वाहत आहे. असे असतानाही थेरगाव येथील केजुबाई बंधारा फेसळला आहे. मोठ्या प्रमाणात पाण्यात फेस निर्माण झाला आहे. यामुळे नदीकाठच्या नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
थेरगाव येथील केजुबाई बंधारा येथे पवना नदीची अवस्था खूपच दयनीय आहे. नदीपात्रात रसायन मिश्रित पाणी सोडल्यामुळे फेस निर्माण झाली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही छोटे व्यावसायिक केमिकलमिश्रित सांडपाणी पवना नदीत थेट सोडत आहेत का? याचा शोध महापालिकेने घ्यावा. विनाप्रक्रिया मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत सोडणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.