अकोल्यात झोपाळ्याचा दोर गळ्यात अडकून तरुणीचा जागीच मृत्यू
A PHP Error was encountered
Severity: Notice
Message: Undefined property: stdClass::$link
Filename: post/_post_share_box.php
Line Number: 27
Backtrace:
File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler
File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view
File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post
File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once
कल्याणी दिपक पोटे ही 21 वर्षीय तरुणी घरी झोपाळ्यावर झोका घेत होती. कल्याणी ही डी.एडची विद्यार्थ्यानी होती. संध्याकाळच्या सुमारास, पाळण्याच्या दोरीवर ती उशी टाकून बसली होती. अचानक उशी सरल्यानंतर ती खाली कोसळून बेडच्या काठावर उपडी पडली आणि झोपाळ्याचा दोर तिच्या गळ्याभोवती अडकला. यात कल्याणीच्या गळ्याचा जबर मार लागला. काही वेळ ती तशीच पडून होती.
ही घटना जेव्हा घडली तेव्हा कल्याणीची आई घराच्या गच्चीवर काम करण्यासाठी गेली होती. तर वडील बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. त्यामुळे जेव्हा दोर कल्याणीच्या गळ्यात अडकला तेव्हा तिला वाचवण्यासाठी कुणीच तेव्हा तिच्यासोबत नव्हतं. त्यामुळे जेव्हा कल्याणीची आई काम आटोपून घरात आली, तेव्हा त्यांनी जे बघितलं, ते हादरवणारं होतं. कल्याणीच्या आईनं आरडाओरडा केल्यानंतर शेजारील नागरीक जमले आणि त्यांना कल्याणीला लगेचच उपचारासाठी नेलं. पण तिथं डॉक्टरांनी कल्याणीला मृत घोषित केलं.