सामाजिक कार्यकर्ते रविराज रघुनाथ साबळे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड

सामाजिक कार्यकर्ते रविराज रघुनाथ साबळे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी निवड
      पिंपरी , (प्रबोधन न्यूज )  -   पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते  रविराज साबळे यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघच्या महाराष्ट प्रदेश अध्यक्षपदी निवड करण्यात आली.    रविराज साबळे हे गेल्या 18 वर्षांपासून (महाविद्यालयीन जीवनापासून) सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.
आजपर्यंत त्यांनी फासा विद्यार्थी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष, वंदे मातरम् संघटना पिं.चिं. शहर जिल्हा प्रमुख तसेच अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिं.चिं.शहर उपाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष पिं.चिं.शहर सरचिटणीस, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (पर्यावरण विभाग) महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच भंडारा जिल्हा प्रभारी, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष या व अशा अनेक जबाबदा-या आजपर्यंत यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. 
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघ प्रदेश कार्याध्यक्षपदी कार्यरत असताना, त्यांनी वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली. या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत महाराष्ट्रातील विविध गरजू रुग्णांची जवळपास १.५ कोटींची बिले कमी केली आहेत. 
आजपर्यंत त्यांनी विविध विषयांवरील चर्चासत्रे, माहिती अधिकार कायद्याचा प्रचार आणि प्रसार, भ्रष्टाचार निर्मुलनासाठी जनजागृती, मतदान जनजागृती, समाजातील विविध प्रश्नांवर आंदोलने केली आहेत. तसेच  आरोग्य शिबीरे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन, समाजातील वंचित - दुर्लक्षित घटकांसाठी विविध प्रकारचे सामाजिक कार्ये आजपर्यंत केले आहे.