"पीएमआरडीए' बांधणार 6,452 घरे, फेज एकनंतर आता  दोनची तयारी पूर्ण 

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

"पीएमआरडीए' बांधणार 6,452 घरे, फेज एकनंतर आता  दोनची तयारी पूर्ण 

पिंपरी, (प्रबोधन न्यूज )  -  परवडणाऱ्या दरामध्ये घरे बांधून देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पिंपरी-चिंचवडमधील पेठ क्रमांक 12 येथील फेज 1 गृहसंकुलनंतर फेज 2 साठी हालचाली सुरू केल्या आहेत. या प्रकल्पात बांधण्यात येणाऱ्या 47 इमारतींमध्ये एकूण 6 हजार 452 घरांची निर्मिती केली जाणार आहे. सुमारे 730 कोटी खर्चून पुढील दोन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दीष्ट "पीएमआरडीए'ने ठेवले आहे.

पिंपरी-चिंचवड ही उद्योगनगरी असल्याने कामासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कामगारांचे शहरात मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. लाखो नागरिक गेली कित्येक वर्षे घरमालकांसोबत भाडेकरार करुन राहत आहेत. अशा मध्यमवर्गीय कामगारांना हक्काची घरे बांधून देण्यासाठी "पीएमआरडीए'कडून पेठ क्रमांक 12 येथील भूखंडावर फेज 1 बांधण्यात आला आहे. त्यामध्ये 4 हजार 883 घरे बांधली असून त्यातील 3 हजार 100 घराच्या ताबा पावत्या लाभार्थ्यांना सुपूर्द केल्या आहेत. उर्वरित घरांचे हस्तांतरण सुरू आहे. आता "पीएमआरडीए'ने याच प्रकल्पाला लागून असलेल्या भूखंडावर फेज 2 घरांचा प्रकल्प बांधण्याची तयारी केली आहे.

फेज 2 मधील प्रकल्पात 47 इमारती बांधण्यात येणार आहेत. या इमारतींमध्ये एकूण 6 हजार 452 घरे बांधली जाणार आहेत. त्यामध्ये 1 बीएचके, 1 आरके आणि दोन प्रकारातील 2 बीएचके घरे असणार आहेत. आर्थिक दुर्बल घटकासाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही घरे बांधण्यात येत आहेत. या प्रकल्पावर 730 कोटी रुपये खर्च होणार असून पुढील दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे, असा दावा "पीएमआरडीए'ने केला आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून निधी उपलब्ध करुन दिला जाणार आहे.

-----------------

"पीएमआरडीए' गृह प्रकल्प
फेज 2
इमारती 47
घरे 6452
1 बीएचके 3234
1 आरके 321
2 बीएचके 1428
2 बीएचके 1326
ईडब्ल्युएस 3652
एलआयजी 2800
प्रकल्प किंमत सुमारे 730 कोटी
-------------------

पेठ क्रमांक 12 मध्ये फेज 2 प्रकल्पाचे कागदोपत्री काम पूर्ण झाले आहे. पुढील आठवड्यात प्रकल्पाचा शुभारंभ केला जाणार आहे. पुढील दोन वर्षाच्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण केला जाईल. या प्रकल्पात आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न घटकासाठी एकूण 6452 घरांची निर्मिती केली जाणार आहे.

प्रभाकर वसईकर, कार्यकारी अभियंता