सांगवी, पिंपळे गुरवमधील स्मार्ट सिटीच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करा – राजेंद्र जगताप

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

सांगवी, पिंपळे गुरवमधील स्मार्ट सिटीच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करा – राजेंद्र जगताप

पिंपरी – सांगवी, पिंपळे गुरवसह या परिसरात झालेली स्मार्ट सिटीची अनेक कामे निष्कृष्ट दर्जाची झालेली असून अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. जनतेच्या शेकडो कोटी रुपयांचा चुराडा करून सत्ताधारी आपली घरे भरत असून या सर्व कामांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तथा माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी केली.

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे यांच्या नेतृत्त्वाखाली शहरात संपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक 46, सांगवी गावठाण येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजेंद्र जगताप बोलत होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमास शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा उज्ज्वलाताई ढोरे, नगरसेविका मायाताई बारणे, नगरसेवक संतोष बारणे, माजी नगरसेवक कैलास बारणे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष संदीप चिंचवडे, माजी नगरसेवक शिवाजी पाडुळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शाम जगताप, युवा नेते तानाजी जवळकर, बाळासाहेब पिल्लेवार, भटू शिंदे, मयूर मधाळे या मान्यवरांसह पक्षाचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना राजेंद्र जगताप म्हणाले, गेल्या पाच वर्षांपासून आमच्या परिसरामध्ये स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. त्यातील अनेक कामे मुदत संपल्यानंतरही अर्धवट स्थितीत असून जी कामे पूर्ण झाली आहेत ती निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अर्धवट कामांचा त्रास परिसरातील रहिवाशांना होत आहे. अनेक कामे अपूर्ण असतानाही त्या कामांचा मोबदला म्हणून ठेकेदारांना कोट्यवधी रुपये अदा केले आहेत. सर्वसामान्य नागरीकांनी कररुपाने पालिकेच्या तिजोरीत जमा केलेल्या रक्कमेची उधळपट्टी सुरू आहे. यातून सत्ताधाऱ्यांचे उखळ पांढरे करण्याचे काम सुरू आहे.

गतेवळच्या निवडणुकीत या परिसरातील नागरिकांना अनेक आश्वासने देण्यात आली होती. त्या केवळ भूलथापाच ठरल्याचेही आता उघड झाले आहे. भ्रष्टाचारातून पैसा आणि पैशातून सत्ता असा खेळ भाजपच्या नेत्यांचा सुरू आहे. जनतेने भाजपच्या भूलथापांना बळी न पडता येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे व पाच वर्षे सत्तेच्या जोरावर त्रास देणाऱ्या भ्रष्ट सत्ताधाऱ्यांना पालिकेतून हद्दपार करावे, असे आवाहनही जगताप यांनी यावेळी केले.