दहावी परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी

दहावी परीक्षेचा निकाल येत्या सोमवारी

    पुणे, (प्रबोधन न्यूज )  -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावीचा निकाल येत्या २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येईल.

राज्यात २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात जवळपास १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांची तसेच त्यांच्या पालकांची धाकधूक वाडली आहे. मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. आता या सर्व नऊ विभागांचा निकाल २७ मे रोजी दुपारी एक वाजता लागणार आहे.

या वेबसाईटवर पाहा निकाल :

https://mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://sscresult.mahahsscboard.in