आळंदी देवस्थानने वारकरी शिक्षण संस्थेला विश्वासात घेतले नाही - भालचंद्र नलावडे

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

आळंदी देवस्थानने वारकरी शिक्षण संस्थेला विश्वासात घेतले नाही - भालचंद्र नलावडे


आळंदी ( प्रबोधन न्यूज ) - माऊलींचे पालखी प्रस्थान सोहळ्याचे नियोजनात मंदिरात वर्षभर सेवा करणाऱ्या त वारकरी शिक्षण संस्थेस पास वाटप करताना श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीने जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला विश्वासात न घेतल्याने खंत व नाराजी व्यक्त करीत संस्थान कमेटी विश्वस्तानीं मनमानी कारभार केला आहे. प्रस्थान दिवशी घडलेल्या प्रकारास आळंदी संस्थान जबाबदार असल्याने विश्वस्तानी राजीनामे द्यावेत. या प्रकरणी राज्य शासनाने आळंदी संस्थान बरखास्त करण्याची मागणी जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे यांनी केली आहे. .  
   देवाच्या आळंदीत प्रस्थान दिनी घडलेला प्रकार देवस्थानच्या मनमानी कारभाराने घडल्याचे सांगत संस्थेचे खजिनदार नलावडे यांनी सांगितले कि. आळंदी संस्थान ला भविष्यात मदत करायची कि, नाही या बाबत जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था विचार करीत आहे. अनेक दशकां पासून आळंदी मंदिरात संस्थेच्या वतीने धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, नित्य नैमित्तिक गुरुवार ला मंदिरात पालखीची प्रदक्षिणा यासाठी संस्थेचे विद्यार्थी सेवा देतात. वर्षभर सेवा करीत असून देखील संस्थेस प्रस्थान सोहळ्याचे नियोजनात कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतले नाही. अगदी प्रस्थानच्या दिवशीही या संस्थांचे पास वाटप नियोजन झालेले नव्हते. प्रस्थांन पुर्वी एक दिवस अगोदर पास देण्यात आले नाहीत. माऊलींचे  नावाने कामकाज करणारे विश्वस्त या घटनेस जबाबदार आहेत. सर्व विश्वस्तानी नैतिक जबाबदारी घेत तात्काळ राजीनामे देणे गरजेचे आहे. ऐतिहासिक सोहळ्यास यावर्षी देवस्थानच्या मुजोर कारभाराने गालबोट लागले आहे. यामुळे राज्य शासनाने आळंदी संस्थान तात्काळ बरखास्त करण्याची मागणी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे यांनी केली आहे.
   प्रस्थान दिनाचा प्रकार घडल्याने आळंदी संस्थानला जबाबदार धरण्यात यावे. त्यांना पास वाटपाचे नियोजन यावर्षी ही जमले नाही. झालेल्या प्रकार बाबत खंत व्यक्त करीत नलावडे म्हणाले, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी संस्कार क्षम, साधक आहे  ते कायम मंदिरात सेवा करीत आहेत. यामुळे प्रस्थान दिनी त्यांना मंदिरात प्रवेशाचे नियोजन होणे आवश्यक होते. मात्र आळंदी संस्थान हे विसरलेच कसे असा सवाल नलावडे यांनी करीत नाराजी व्यक्त केली.