कामगारनेते इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिम्मित अंध बांधवांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

कामगारनेते इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिम्मित अंध बांधवांना  जीवनावश्यक   वस्तूचे वाटप

क्रांतिवीर मित्र मंडळाच्या वतीने चिंचवडच्या हॅन्डीकॅप सेंटर येथे कार्यक्रमाचे आयोजन

पिंपरी .  (प्रबोधन न्यूज )- कामगार नेते व शिवसेना उपनेते इरफानभाई सय्यद यांच्या वाढदिवसानिम्मित यमुनानगर येथील क्रांतिवीर मित्र मंडळाच्या वतीने चिंचवड येथील अपंग रोजगार उद्योग व तांत्रिक प्रशिक्षण केंद्र (हॅन्डीकॅप सेंटर) येथील अंध बंधु भगिनींना घरगुती जीवनातील आवश्यक वस्तूचे वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला.

कामगारनेते इरफानभाई सय्यद यांचे निकटवर्तीय सहकाऱ्यांना मातृशोक झाल्याने त्यांच्या दुःखात मी वाढदिवस साजरा करणे योग्य नाही, मी त्यांच्या दुःखात सहभागी असल्याने तातडीने सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, या निर्णयामुळे त्यांचे कौतुक होत आहे, सहकारी मित्र व कामगार वर्गात त्यांचे विशेष आकर्षण आहे, हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व सहकारी मित्र त्यांच्या वाढदिवसानिम्मित शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी उपस्थित असतात परंतु यावर्षी दुःखाचे सावट असल्याने सर्व कार्यक्रम तातडीने रद्द करण्यात आले होते.

क्रांतिवीर मित्र मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत सुतार यांनी नियोजित कार्यक्रम रद्द न करता अंध बांधवांना मदतीचा हात देणे गरजेचे आहे असा निर्धार केला हीच भाईंची शिकवण असल्याची प्रतिक्रिया श्रीकांत सुतार यांनी दिली. 

यावेळी भिमाजी पानमंद, पंकज साबळे, विजय घोडके, किशोर हातागळे, उमेश घोडेकर, रुपल माने, राहुल चंदेल, सौरभ वाघमारे, प्रशांत तरटे, स्वप्निल लोंढे यांच्यासह  क्रांतिवीर मित्र मंडळाचे पदाधिकारी व सर्वपक्षीय मित्र परिवार यावेळी उपस्थित होते.