हातभट्टी दारू बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा; पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

A PHP Error was encountered

Severity: Notice

Message: Undefined property: stdClass::$link

Filename: post/_post_share_box.php

Line Number: 27

Backtrace:

File: /home/prabo1/public_html/application/views/post/_post_share_box.php
Line: 27
Function: _error_handler

File: /home/prabo1/public_html/application/views/post/post.php
Line: 78
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 294
Function: view

File: /home/prabo1/public_html/application/controllers/Home_controller.php
Line: 119
Function: post

File: /home/prabo1/public_html/index.php
Line: 326
Function: require_once

हातभट्टी दारू बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा; पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
हातभट्टी दारू बाळगल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा; पावणे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - हातभट्टी दारू बाळगल्या प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने तिघांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईमध्ये पाच लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 5) सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास थरमॅक्स कंपनीजवळ एमआयडीसी चिंचवड येथे करण्यात आली.
बाळू पवार (रा. आनंदनगर, चिंचवड) आणि त्याच्या दोन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार मितेश यादव यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या ताब्यातील एका बोलेरो पिकप मध्ये 70 हजारांची 700 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आणि 550 रुपये किमतीचे इतर साहित्य बाळगले. याबाबत माहिती मिळाली असता अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून बोलेरो पिकप, तयार दारू आणि इतर साहित्य असा एकूण पाच लाख 70 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.